महाराष्ट्र

maharashtra

Heavy Rains In Satara : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने घेतला 'हा' मोठा निर्णय

By

Published : Jul 22, 2023, 3:12 PM IST

अतिवृष्टीमुळे पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग धोकादायक बनले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे काही काळासाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय सातारा प्रशासन आणि बांधकाम विभागाने घेतला आहे. तसेच दरड हटवण्यासाठी सोमवारी सातारा - यवतेश्वर - कास रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. (Heavy Rains In Satara)

Heavy Rains In Satara
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर झाडे, दरडी कोसळत आहेत. अनेक मार्ग धोकादायक बनले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे काही काळासाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय सातारा प्रशासन आणि बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पूर, भूस्सखलन आणि संभाव्य इशार्‍यांची माहिती घेऊनच पर्यटनाचा बेत आखणे पर्यटकांसाठी सुरक्षिततेचे ठरणार आहे. बोगदा - यवतेश्वर - कास रस्ता सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टी तसेच भूस्सखलनामुळे सातारा, यवतेश्वर, कास या घाटातील दगड धोकादायक बनले आहेत. दरड अथवा दगड कोसळल्यास जीवीत आणि वित्त हानीची शक्यता आहे.

रविवारी रस्ता राहणार बंद : त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि. 24) बांधकाम विभागामार्फत सांबरवाडी यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड, दगड फोडण्यात येणार आहेत. त्या मुळे रविवारी रात्री 12 पासून सोमवार (दि. 24) रात्री 12 पर्यंत सातार्‍यातील बोगदा, यवतेश्वर, कास हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

300 मीटर परिसरात मनाई: धोकादायक दगड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना घटनास्थळापासून 200 ते 300 मीटर परिसरात व्यक्ती, पशू धनाला प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी जाण्यास नागरीकांना पूर्णपणे मनाई असणार आहे. बोगदा-यवतेश्वर-कास रस्ता खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बंद करण्यात येणार असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी केले आहे.

पर्यटनस्थळे काही काळासाठी बंद : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सध्या अतिवृष्टी होत आहे. यामुळे पूर आणि दरडींचा धोका वाढला आहे. यामुळे कास तलाव, ठोसेघर, लिंगमळा धबधबा, सडावाघापूरचा उलटा धबधबा, वजराई धबधबा, कोयनानगर परिसरातील नवजाचा ओझर्डे धबधबा, यासारखी पर्यटनस्थळे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक पर्यटक येतात. परंतु, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही पर्यटनस्थळे काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

  1. Heavy Rains In Satara : आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर आले पुराचे पाणी
  2. Satara Crime : पर्यटनस्थळांवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सातशे फूट दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details