महाराष्ट्र

maharashtra

Governor Visit Mahabaleshwar : राज्यपाल रमेश बैस सोमवारपासून तीन दिवस महाबळेश्वर दौऱ्यावर

By

Published : May 20, 2023, 10:52 PM IST

राज्यपाल पदाची सूत्रे घेतल्यानंतर रमेश बैस हे पहिल्यांदाच सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दि. २२ ते २५ मे या दरम्यान ते सहकुटुंब महाबळेश्वरच्या राजभवनमध्ये मुक्काम असणार आहेत.

Governor Visit Mahabaleshwar
Governor Visit Mahabaleshwar

सातारा : राज्यपाल पदाची सूत्रे घेतल्यानंतर रमेश बैस हे पहिल्यांदाच सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दि. २२ ते २५ मे या दरम्यान त्यांचा सहकुटुंब महाबळेश्वरच्या राजभवनमध्ये मुक्काम असणार आहे. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने राज्यपालांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे.

सत्तासंघर्षामुळे दौरा लांबणीवर :महाराष्ट्राचे राज्यपाल हे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला येतात. राज्यपाल पदाची सूत्रे घेतल्यानंतर रमेश बैस यांचा दि. १० ते १७ मे असा महाबळेश्वर दौरा निश्चित झाला होता. परंतु, महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्षावरील निर्णयामुळे दौरा अचानक लांबणीवर गेला होता

राज्यपालांचा पहिलाच सातारा दौरा :राज्यपाल रमेश बैस हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत असल्याने प्रशासनाने राज्यपाल दौऱ्याची जय्यत तयारी केली होती. या दौऱ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमसुद्धा नियोजित है. परंतु, आता राज्यपालांचा दौरा निश्चित झाला असून सोमवारपासून गुरूवारपर्यंत ते महाबळेश्वरमध्ये असणार आहेत. या दौऱ्यामुळे प्रशासन गतिमान झाले आहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम :राज्यपाल रमेश बैस हे सोमवारपासून महाबळेश्वर दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या उपस्थितीत प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाबळेश्वरमधील राजभवनमध्ये राज्यपालांचा मुक्काम असणार आहे. प्रसार माध्यमांशीही राज्यपाल संवाद साधणार आहेत.

पोलिसांनी सुरक्षेसाठी सज्ज : राज्यपाल मुक्कामी असलेल्या महाबळेश्वर येथील निवासस्थानाची पोलिसांनी पाहणी केली आहे. तसेच तेथील यंत्रणेचा आढावा घेणार आहे. राज्यपाल बैस किल्ले प्रतापगड, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, प्रसिद्ध आर्थरायटिस पॉइंट इत्यादींना भेट कुंटूंबासह भेट देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. Raj Thackeray On Trimbakeshwar : 'कोणी मंदिरात आल्याने आपला धर्म बुडेल एवढा तो कमकुवत आहे का?'
  2. Aaditya Thackeray On CM : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान; म्हणाले, राजीनामा....
  3. Nitesh Rane On Uddhav Thackeray : दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढली - नितेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details