Aaditya Thackeray On CM : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान; म्हणाले, राजीनामा....
Published: May 20, 2023, 6:07 PM


Aaditya Thackeray On CM : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान; म्हणाले, राजीनामा....
Published: May 20, 2023, 6:07 PM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांची राजीनामा देण्याची तयारी असेल तर, माझ्या विरोधात एकनाथ शिंदेंनी निवडणुकीत उतरुन दाखवावे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे असा वाद रंगणार आहे. याआधीही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते.
मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिंदे सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंना राजीनामा देण्याचे आव्हान दिले. माजी मंत्री, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मी राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु माझ्याविरोधात मुख्यमंत्री शिंदेंना निवडणुकीत उतरा, असे सूचक इशारा दिला. मुंबईत ते बोलत होते.
फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचे आयोजन : कुपरेज फुटबॉल मैदानात मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया, मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे आजपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचे आयोजन केले आहे. रेफ्री, महिला कोचेसला यावेळी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा ही प्रशिक्षणात सहभाग असणार आहे. आदित्य ठाकरे या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
राज्यात घटनाबाह्य सरकार : मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदित्य ठाकरेंमध्ये सध्या जुंपली आहे. नुकतेच ठाकरेंनी राजीनामा द्यावा, असे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंनी त्यांना थेट प्रतिआव्हान दिले.
राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. भाजपने घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभे करणार असेल तर, मी आताच राजीनामा देतो. त्यांची तयारी असेल, तर माझी लढण्याची तयारी आहे. मुनगंटीवार यांचे राज्य सरकारमध्ये कोणी ऐकत नाहीत - आदित्य ठाकरे
नोट बंदीचा अभ्यास करावा : देशातून आदित्य ठाकरे यांनी दोन हजार रुपयांची नोट बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने त्यावर अभ्यास करावा. यापूर्वीची नोटबंदी, त्याचा ताळेबंद यांचा हिशोब लागला नाही. तो हिशोब आता मांडला गेला पाहिजे. आरबीआयने त्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असे परखड मत ठाकरेंनी मांडले.
भ्रष्टाचारी सरकार : मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडले. मिंधेचा नालेसफाई दौरा म्हणजे राज्यात अगोदरच चिखल केला आहे, यात भर टाकणारा आहे. महाराष्ट्रात शंभर टक्के भ्रष्टाचार सरकार आहे. मुंबई मनपात रस्ते घोटाळा, फर्निचर खरेदी घोटाळ्या बाबत भाजपच्या माजी नगरसेवकानी पत्र दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. मुंबई महापालिका महापौर, इतर मुद्द्यांवरून एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे, नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. आमचे सरकार असताना कोणतेही वाद, जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारीसाठी हे वाद, दंगली होत आहेत का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
महिलांना अपशब्द : तसेच राज्यात महिलाना शिवीगाळ होत आहे. त्याच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. त्यांचा अपमान होत आहे असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्नाटकात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आम्ही शुभेच्छा देतो. तेथील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नये. नव्या सरकारला देखील लक्ष द्यायला सांगू, असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -
- Nitesh Rane On Uddhav Thackeray : दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढली - नितेश राणे
- Devendra Fadnavis Meet Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांनी घेतली आशिष देशमुखांची भेट, भाजप प्रवेशाची चर्चा
- Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेस बैलाला धडकली, अपघातात ट्रेनचे मोठे नुकसान
