महाराष्ट्र

maharashtra

Morgiri Gram Panchayat : मोरगिरी ग्रामपंचायतीत ६० वर्षांनी सत्तांतर; शिवसेनेच्या 'या' गटाने मारली बाजी

By

Published : Oct 17, 2022, 1:14 PM IST

Morgiri Gram Panchayat
मोरगिरी ग्रामपंचायत ()

सातार्‍यातील पाटण तालुक्यात पाचही ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये मोरगिरी या ग्रामपंचायतीत (Morgiri Gram Panchayat ) शिंदे गटाने तब्बल ६० वर्षांनी सत्तांतर घडवून आणत सर्व ८ जागा जिंकल्या आहेत. पाटण तालुक्यातील पाचपैकी ४ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने आपला झेंडा फडकवला ( Shinde group hoisted its flag) आहे. तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले ( NCP maintained dominance ) आहे.

सातारा :सातार्‍यातील पाटण तालुक्यात पाचही ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये मोरगिरी या ग्रामपंचायतीत ( Morgiri Gram Panchayat )शिंदे गटाने तब्बल ६० वर्षांनी सत्तांतर घडवून आणत सर्व ८ जागा जिंकल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालातील ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील पाचपैकी ४ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने आपला झेंडा फडकवला ( Shinde group hoisted its flag) आहे. या ग्रामपंचायतींमध्ये उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई ( Excise Minister Shambhuraj Desai ) यांचे नेतृत्व माननार्‍या पॅनेलने विजय मिळवला आहे.


मोरगिरी ग्रामपंचायतीमध्ये ६० वर्षांनंतर सत्तांतर :पाटण तालुक्यातील दुर्गम भाग असणार्‍या मोरणा खोर्‍यातील मोरगिरी या बाजारपेठेचे ठिकाण असणार्‍या ग्रामपंचायतीवर गेली ६० वर्षे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे वर्चस्व होते. त्या वर्चस्वाला धक्का देत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणार्‍या पॅनेलने सरपंचपदासह सर्व ८ जागा जिंकून शिंदे गटाचा झेंडा फडकवला आहे. मोरगिरी ही पाटण तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत मानली जाते. ही ग्रामपंचायत ताब्यात आल्यामुळे शंभूराज देसाई गटामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.


पाचपैकी चार ग्रामपंचायती शिंदे गटाकडे :पाटण तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व असलेल्या मान्याचीवाडी, भिलारवाडी आणि सुतारवाडी, या तीन ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. मोरगिरी आणि घाणव या दोन ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. यापैकी घाणव याठिकाणी सरपंच आणि सदस्याच्या एका जागेसाठी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर मोरगिरी तालुका पाटण ग्रामपंचायतीचा पहिला निकाल समोर आला. तब्बल ६० वर्षांनी सत्तांतर झाल्याचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे शंभूराज देसाई समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. घाणव या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते पाटणकर गटाचे वर्चस्व होते. ते वर्चस्व कायम राखण्यात पाटणकर गट यशस्वी ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details