महाराष्ट्र

maharashtra

Sangli Murder Case: जतच्या "त्या" मायलेकींचा हत्येचा धक्कादायक उलगडा, भावकीतील तरुणांनी केला खून

By

Published : Apr 29, 2023, 10:16 PM IST

जत तालुक्यातल्या कुणीकोनूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईसह अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आता या हत्ये प्रकरणी धक्कादायक उलगडा झाला आहे.

sangli murder case
भावकीतील तरुणांनी केला खून

सांगली : करणी-भानामती असे प्रकार समाजात दिसून येत आहेत. जतच्या कुणीकोनूर येथील मायलेकींच्या झालेल्या हत्ये प्रकरणी धक्कादायक उलगडा झाला आहे. मायलेकीच्या खून प्रकरणात आरोपी वेगळेच निष्पन्न झाले आहेत. करणी केल्याच्या संशयातून मायलेकींचे ही त्यांच्याच भावकीतील तरुणांनी केल्याचे उमदी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उमदी पोलिसांनी दोघांना अटक केले असून एक जण फरार आहे. अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार यांनी दिली आहे.



कुणी कोनूर गावात 24 एप्रिल रोजी: या मायलेकींचा गळा आवळून खून झाला होता. या सदरचा खून पतीने केल्याच्या संशयातून पती बिराप्पा बेंळूखे यास अटक करण्यात आली होती. उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी याचा सखोल तपास करून सदरचा खूनाच्या मुख्य मारेकरांचा छडा लावला आहे. याप्रकरणी विकास मारुती बेळुंखे आणि अक्षय रामदास बेळुंखे, हे दोघे संशयतांना अटक करण्यात आली आहे. तर बबल्या बेळुंखे हा फरार झाला आहे.

जत तालुक्यात घडले दुहेरी हत्याकां: सदरचे तरुण मृत बेळुंखे यांच्या भावकीतील आहेत. मृत प्रियांका बेंळूखे या करणी करतात आणि त्यातून त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाचा मृत्यू झाला, असा संशय तिघांना होता. या संशययाच्या रागातून प्रियंका बेंळूखे या महिलेचा 23 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास त्या राहत असलेल्या घरात घुसून गळा आवळून खून केला. सदरची घटना मुलीने पहिल्याने, तिघांनी खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर अटक करण्यात आलेला पती बिराप्पा बेळुंखे हा निर्दोष असल्याचे देखील समोर आले आहे. तर करणी-भानामतीच्या संशयातून दोघींचा काटा काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा:Sangli News पोहण्याकरिता तिघांनी कॅनॉलमध्ये घेतली उडी दोघे गेले वाहून तिसऱ्याला वाचविण्यात आले यश

ABOUT THE AUTHOR

...view details