महाराष्ट्र

maharashtra

अघोरी! श्वानाचे कान कापणे डॉक्टरला पडले महागात, डॉक्टरवर दाखल झाला गुन्हा

By

Published : Oct 1, 2021, 10:25 PM IST

Cutting a dog's ear cost the doctor dearly, a crime was committed against the doctor

सांगलीतील एका डॉक्टरने स्वतःच्या कुत्र्यावर अघोरी उपचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने तीन महिन्यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळातून कापले आहेत. याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली -डॉबरमॅन जातीच्या एका श्वानाचे एका डॉक्टरने मुळापासून कान कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी सांगलीतील डॉक्टरवर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राहत फॉर ॲनिमल या संस्थेच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आले. सुंदर दिसण्याबरोबर स्पर्धेत नंबर मिळवण्यासाठी हा अघोरी उपचार करण्यात आला असे सांगितले जात आहे.

श्वानाचे कान कापल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल

डॉक्टर माणसाचा उपचार प्राण्यावर -

सांगलीतील संजय नगर येथील रजपूत कॉलनी येथे राहणाऱ्या एका डॉक्टरने स्वतःच्या कुत्र्यावर अघोरी उपचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळातून कापण्यात आले आहेत. डॉक्टर सुनील कोल्हे असे या डॉक्टरचे नाव आहे. कोल्हे हे माणसांचे डॉक्टर आहेत. मात्र त्यांनी आपल्या श्वानावर हे अघोरी उपचार केले आहेत. याबाबत प्राणीमित्र संघटना राहत फॉर ॲनिमल संस्थेने याची संपूर्ण माहिती घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. सुनील कोल्हे यांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०- कलम ११, ३८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१- कलम ११९, श्वान प्रजनन आणि विपणन नियम, २०१७ आणि भारतीय दंड संहिता १८६०- कलम ४२९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.वाय. क्षीरसागर यांनी दिली आहे.

का कापतात कान व शेपूट ?

डॉबरमॅन व काही जातीच्या श्वानांचे प्रामुख्याने कान आणि शेपूट कापण्यात येतात. सुंदर दिसण्याबरोबर स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षीस मिळावा यासाठी प्रामुख्याने अशा प्रकारचे अघोरी उपचार केले जातात. मात्र नैसर्गिक अवयव गमवावे लागल्याने त्या श्वानांना पुढील काळात वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे. अशा प्रकारच्या घटना या सर्वत्र घडतात, त्यामुळे याच्या बाबतीत विशेष कायदाही करण्यात आला आहे. मात्र तरीही बेकायदेशीररित्या कान आणि शेपूट कापण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणखी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत ॲनिमल फॉर राहत संस्थेचे सदस्य कौस्तुभ पोळ यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -येत्या काही तासांत शाहीनची तीव्रता वाढणार, २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details