महाराष्ट्र

maharashtra

राजापूरमध्ये रिफायनरीवरून वातावरण तापले, सर्वेक्षणाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

By

Published : Jun 9, 2022, 12:17 PM IST

villagers blocked survey at Shivne Khurd village
धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प विरोध

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी ( Dhopeshwar refinery project ) प्रकल्पाच्या विरोधाता देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे सोलगाव येथील ग्रामस्थ ( Shivne Khurd village ) एकवटले आहेत. त्यामुळे, राजापूरमध्ये पुन्हा एकदा रिफायनरी ( Villagers blocked survey at Shivne Khurd village ) विरोध तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी -राजापूर तालुक्यातील प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी ( Dhopeshwar refinery project ) प्रकल्पाच्या विरोधाता देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे सोलगाव येथील ग्रामस्थ ( Shivne Khurd village ) एकवटले आहेत. त्यामुळे, राजापूरमध्ये पुन्हा एकदा रिफायनरी ( Villagers blocked survey at Shivne Khurd village ) विरोध तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी शिवणे खुर्द गावाच्या माळरानावर सुरू असलेला सर्व्हे रिफायनरी विरोधकांनी रोखून धरला.

माहिती देताना नरेंद्र जोशी

हेही वाचा -Refinery Project : रिफायनरी प्रकल्पस्थळी सर्वेक्षणाचे काम सुरळीतपणे सुरू, अफवांवर विश्वास ठेऊ नये - रवींद्र नागरेकर

शिवणे खुर्दच्या माळरानावर सुरू असलेल्या सर्व्हेसाठी आलेल्या गाड्या देखील अडवून ठेवण्यात आल्या आहेत. इथे कामासाठी आणलेली हत्यारे देखील ग्रामस्थांनी ताब्यात ठेवली आहेत. आपल्या हक्काच्या जमिनीत सरकारकडून अनधिकृत सर्व्हे कसा सुरू आहे, असा आरोप करत जोपर्यंत अधिकृत कागदपत्रे दाखवली जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

जोपर्यंत बेकायदेशीर सर्वेक्षण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, योग्य ती कागदपत्रे दाखवली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला. आणि रात्रभर गोवळ-शिवणे माळरानावर आंदोलन करण्यात आले. रिफायनरी विरोधी पोवाडे, भजन करण्यात आले. जवळपास 400 हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. आज सकाळी देखील हे आंदोलन सुरू आहे.

चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम हे लगेच थांबावले गेले पाहिजे, तसेच अधिकारी जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, नरेंद्र जोशी यांनी मांडली आहे.

हेही वाचा -आघाडीकडे 168 आमदारांची मते, पहिल्या फेरीतच चारही उमेदवार निवडून येतील - भास्कर जाधव

ABOUT THE AUTHOR

...view details