महाराष्ट्र

maharashtra

भविष्यामध्येही उद्धव साहेबांच्या शब्दाबाहेर मी कधीच नसेन - रामदास कदम

By

Published : Jun 2, 2022, 8:27 PM IST

Updated : Jun 2, 2022, 9:12 PM IST

उद्धव साहेबांनी माझ्या मुलाला विधानसभेचं तिकीट दिलं, त्याला निवडूनही आणला, यापेक्षा मला आणखी काय हवं आहे. तसेच भविष्यामध्येही उद्धव साहेबांच्या शब्दा बाहेर मी कधीच नसेन आणि माझ्याबाबतीत कोणीही कितीही अफवा उठवल्या तरी मरेपर्यंत मी स्वतःला गद्दारीचा डाग कधीही लावून घेणार नाही असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

shivsena leader ramdas kadam on uddhav thackerays politics
रामदास कदम

रत्नागिरी - भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या शब्दा बाहेर मी कधीच नसेन आणि माझ्याबाबतीत कोणीही कितीही अफवा उठवल्या तरी मरेपर्यंत मी स्वतःला गद्दारीचा डाग कधीही लावून घेणार नाही, असे शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी म्हटले आहे. ते खेडमध्ये बोलत होते. दरम्यान शिवसेनेच्या सभेला मला उद्धव साहेबांनी बोलावलं आहे. संजय राऊत यांना त्यांनी सांगितलं आहे, की रामदास भाईंना सभेला बोलवा, तसा मॅसेज मला संजय राऊत यांनी दिलेला आहे. पण आपली तब्येत ठीक नसल्याने आपण या सभेला जावू शकत नाही, पण उद्धव साहेब ठाकरे यांना आपण भेटायला जाणार आहोत, असे रामदास भाई यांनी म्हटले आहे.

भविष्यामध्येही उद्धव साहेबांच्या शब्दा बाहेर मी कधीच नसेन -शिवसेना नेते रामदास कदम गेले काही दिवस दिवस नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान शिवसेना हे आमच एक कुटुंब, एक घर आहे, मी इथं पुर्ण समाधानी असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी सष्ट केलं आहे. उद्धव साहेबांनी माझ्या मुलाला विधानसभेचं तिकीट दिलं, त्याला निवडूनही आणला, यापेक्षा मला आणखी काय हवं आहे. तसेच भविष्यामध्येही उद्धव साहेबांच्या शब्दा बाहेर मी कधीच नसेन आणि माझ्याबाबतीत कोणीही कितीही अफवा उठवल्या तरी मरेपर्यंत मी स्वतःला गद्दारीचा डाग कधीही लावून घेणार नाही असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

Last Updated :Jun 2, 2022, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details