महाराष्ट्र

maharashtra

Ratnagiri Police Vigilance : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त, अनेक उपाययोजना करणार

By

Published : Dec 28, 2022, 6:24 PM IST

Ratnagiri Police Vigilance
पोलिसांचा तगडा बंदोबस्त

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस (Ratnagiri District Police) सज्ज (Ratnagiri Police Vigilance) झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात येत असतात. त्यात यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त सण साजरे झाले. त्यामुळे थर्टी फर्स्टलाही (strong arrangements On Thirty First) यावर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. दरम्यान थर्टी फर्स्ट दिवशी जिल्ह्यात कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी पोलिस दक्ष राहणार आहेत.

प्रतिक्रिया देतांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी :थर्टी फर्स्ट म्हणटलं की, तरुणांच्या अंगात उत्साह संचारतो. तरुणांप्रमाणेच अनेक कुटूंब देखील नवीन वर्षे साजरे करायला बाहेर पडत असतात. मात्र, काही लोकांच्या अतिउत्साहामुळे अनेकदा नको ते प्रसंग उद्भवतात. या सर्व गोष्टींची दक्षता घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस (Ratnagiri District Police) सज्ज (Ratnagiri Police Vigilance) झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या जिल्ह्यात येत असतात. त्यात यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त सण साजरे झाले. त्यामुळे थर्टी फर्स्टलाही (strong arrangements On Thirty First) यावर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. दरम्यान थर्टी फर्स्टच्या दिवशी जिल्ह्यात कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी पोलिस दक्ष राहणार आहेत.

महिलांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व : विशेषतः समुद्रकिनाऱ्यांसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस गस्त घालणार आहे. तसेच गुप्त पध्दतीने पोलिस फिरणार आहेत, त्यांच्याकडे छुपे कॅमेरे देखील असणार आहेत. महिला सुरक्षेला प्राधान्य राहणार असून, हुल्लडबाजांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ धनंजय कुलकर्णी यांनी दिली. 31 डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारी महिलांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देणार असल्याचं डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं.


मोहिमेला सहकार्य करण्याचं आवाहन : तसेच जिल्ह्यातील मंदिरे, गडकिल्ले या वास्तूंचे व जागांचे पावित्र्य भंग होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यप्राशन करताना आढळल्यास, तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. पोलिसांच्या या मोहिमेला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.

सुमद्र किनारी गस्त :रत्नागिरी येथे काही नागरीक नवीन वर्ष साजरे करण्यास धार्मिक स्थळी जातात. यातीलच महत्वाचं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे होय. याठिकाणी गेल्यावर देखील पर्यटकांना समुद्रात मज्जा करण्याचा मोह आवळत नाही. असे करत असतांना कुणाच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी पोलिस सुमद्र किनारी देखील गस्त घालणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details