महाराष्ट्र

maharashtra

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात ५ दिवस अवजड वाहनांना बंदी

By

Published : Sep 5, 2021, 7:38 PM IST

मुंबई गोवा महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. निर्बंधही शिथिल झाले आहेत.

रत्नागिरी - गणेशोत्सवानिमित्त कोकणात रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. तसेच गणेशोत्सव काळात ५ दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.

महामार्गावर वाहतूककोंडीची शक्यता घेऊन निर्णय

खालापूर टोल नाक्याजवळ पेण, वडखळ, आणि पुई पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे कोकणात एसटी, खासगी बस आणि चारचाकी वाहनाने येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या कालावधीत अवजड वाहतूक राहणार बंद

वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १ ९ सप्टेंबरला अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. लांजा, बावनदी, आरवली, सावर्डे, चिपळूण, पशुराम घाट, लोटे, नागोठणे, इंदापूर, महाड, कशेडी घाटातही खड्डे असून चिपळूणजवळ चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वाहतुकीला याचा फटका बसणार आहे. गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ४४ प्रवाशांच्या ग्रुपसाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव काळात ५ दिवस अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details