महाराष्ट्र

maharashtra

गणपतीपुळे देवस्थानचा 'पुन्हा' मदतीचा हाथ; पीएम केअर फंडसाठी दिले 11 लाख

By

Published : Apr 22, 2020, 1:01 PM IST

गणपतीपुळे देवस्थानने सुरुवातीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाखाची मदत दिली होती. त्यानंतर आता गणपतीपुळे मंदिर देवस्थानकडून पुन्हा एकदा कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी अकरा लाखांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे देवस्थानने एकूण 22 लाखांची मदत कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सरकारकडे जमा केली आहे.

गणपतीपुळे
गणपतीपुळे

रत्नागिरी - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत. याचप्रमाणे जगप्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थाननेही मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहाय्यता निधीनंतर आता पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 11लाखांची मदत दिली आहे.

गणपतीपुळे देवस्थानने सुरुवातीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाखाची मदत दिली होती. त्यानंतर आता गणपतीपुळे मंदिर देवस्थानकडून पुन्हा एकदा कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी अकरा लाखांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे देवस्थानने एकूण 22 लाखांची मदत कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सरकारकडे जमा केली आहे. याशिवाय देवस्थानचे कर्मचारी आणि विश्वस्थांनी स्वतः एक लाखांची रक्कम गोळा केली गेली. ही रक्कमही पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे.

हेही वाचा -नांदेडहून यात्रेकरू निघाले पंजाबला, इंदूरमध्ये अडवून परत पाठवले नांदेडला; ९० यात्रेकरुविरुद्ध गुन्हा दाखल...

ABOUT THE AUTHOR

...view details