महाराष्ट्र

maharashtra

माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

By

Published : Jan 28, 2020, 1:19 PM IST

माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील भाविकांची सर्वाधिक संख्या याठिकाणी पाहायला मिळाली.

माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी
माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

रत्नागिरी- माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत गणपतीपुळे येथे सध्या माघी गणेशोत्सव सुरू आहे. यावर्षी २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याला धक्काबुक्की

दरम्यान, या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. राज्यातीलच नव्हे तरे देशभरातील गणेशभक्त यानिमित्त गणपतीपुळ्यात दर्शनासाठी येतात. आज माघी गणेश जयंती असल्याने सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील भाविक सर्वाधिक पाहावयास मिळाले.

Intro:माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

रत्नागिरी, प्रतिनिधी

माघी गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीतल्या श्री देव संस्थान गणपतीपुळे येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सध्या माघी गणेशोत्सव सुरु आहे. यावर्षी २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक श्रींच्या दर्शनासाठी इथे येत असतात. राज्यातीलच नव्हे तरे देशभरातील गणेशभक्त यानिमित्त गणपतीपुळ्यात श्रींच्या दर्शनासाठी येतात. आज माघी गणेश जयंती असल्यानं सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतले भाविक सर्वाधिक पहावयास मिळाले.


बाईट - अभिजीत घटवटकर ,पुजारीBody:माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी
Conclusion:माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details