महाराष्ट्र

maharashtra

फळांच्या राजावर तुडतुड्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव, बागाईतदार हवालदील

By

Published : Jan 7, 2020, 5:04 PM IST

due-to-change-in-atmosphere-mango-crop-loss-in-raigad
आंबा पिकाचे नुकसान

आंबा मोहर संरक्षणाची पूर्वतयारी म्हणून नवीन फुटणाऱ्या पालवीवर शेंडा पोखरणारी आळी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी असे अवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

रायगड - वातावरणामध्ये होणाऱ्या सततच्या बदलामुळे सततच्या बदलामुळे भुरी, तुडतुड्या रोगाने आंब्याच्या फळबागा ग्रासल्या आहेत. यंदा लांबलेल्या पावसामुळे उशिरा का असेना आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात झाली. मात्र, रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे फळबागांना फटका बसत आहे. यामुळे आंबा शेतकरी हवालदील झाला आहे.

फळांच्या राजावर तुडतुड्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव, बागाईतदार हवालदील

हेही वाचा -

बदलत्या वातावरणामुळे यंदा आंबा पिकाला फटका बसला आहे. आंबा मोहर येण्यास सुरूवात झाली असताना आता तुडतुड्या आणि भुरी रोगांचे संकट फळबांगावर कोसळले आहे. त्यामुळे आंबा बागाईतदार यांना आर्थिक नुकसान होणार आहे.

जिल्ह्यातील आंबा क्षेत्र -

  • आंबा लागवडीखालील क्षेत्र - 42 हजार हेक्‍टर
  • उत्‍पादनक्षम क्षेत्र - 14 हजार हेक्‍टर
  • दरवर्षी उत्‍पादन - 21 हजार मेट्रिक टन
  • अधिक उत्‍पादन देणारे तालुके - श्रीवर्धन, म्‍हसळा, महाड, माणगाव, अलिबाग

आंबा मोहर संरक्षणाची पूर्वतयारी म्हणून नवीन फुटणाऱ्या पालवीवर शेंडा पोखरणारी आळी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी असे अवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Intro:स्लग - आंब्यावर तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव, बागायतदार हवालदिल

अँकर - आधीच आंब्याचा हंगाम लांबलेला असतानाच वातावरणात सततच्या बदलामुळे भुरी, तुडतुड्या रोगाने आंबा पीक ग्रासले आहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे शेतीवर परिणाम झाला. उशिरा का होईना मोहोर यायला सुरुवात झाली असतानाच रोगांचा प्रादुर्भाव सुरू झालाय. तुडतुडे मोहोर गळून पाडताहेत तर भुरीमुळे मोहोर काळवंडतोय. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झालाय.





Body:अवेळी पाऊस आणि थंडीचा हंगाम अजून पाहिजे तसा सुरू झालेला नाही. त्यामुळे आंबा पिकाला याचा फटका पडणार आहे. आंबा मोहर येण्यास सुरुवात झाली असताना आता तुडतुड्या आणि भुरी रोगांचे संकट आंबा पिकावर चाल करून आलेले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार यांना याचा फटका पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा यावेळी बाजरात उशिरा येणार असल्याने त्याचीही चिंता आंबा बागायतदार याना सतावत आहे. त्यात आता आंब्यावर आलेल्या रोगामुळे बागायतदार यांना पिकाची काळजी सतावू लागली आहे.

Conclusion:जिल्ह्यातील आंबा क्षेत्र

आंबा लागवडीखालील क्षेत्र - 42 हजार हेक्‍टर
उत्‍पादनक्षम क्षेत्र - 14 हजार हेक्‍टर
दरवर्षी उत्‍पादन – 21 हजार मेट्रिक टन
अधिक उत्‍पादन देणारे तालुके – श्रीवर्धन, म्‍हसळा, महाड, माणगाव, अलिबाग

---------------------------------
आंबा मोहर संरक्षणाची पूर्वतयारी म्हणून नवीन फुटणाऱ्या पालवीवर शेंडा पोखरणारी आळी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलंय.

बाईट 1 – पांडुरंग शेळके , जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी
...........................

ABOUT THE AUTHOR

...view details