महाराष्ट्र

maharashtra

Molestation Case : अमृता फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दुसऱया महिलेला पाठवणे पडले महागात; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा

By

Published : May 25, 2023, 3:37 PM IST

Molestation Case Against Youth

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ महिलेला पाठविणाऱ्या एका तरुणावर पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर मिश्रा असे आरोपी तरुणाचे नाव असून तो नागपूरचा रहिवासी आहे.

पुणे:याबाबत अधिक माहिती अशी की, वेश्या व्यवसायाला 'डिग्निटी' मिळायला पाहिजे, असे अमृता फडणवीस बोलत असल्याचा व्हिडिओ पुण्यातील एका महिलेला पाठविल्याचा युवकावर आरोप आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य असलेला हा व्हिडिओ 'क्रॉप पॉप' करून आरोपी किशोर मिश्राने पुण्यात विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेला पाठविला. त्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपीचा शोध सुरू: तरुणाने अमृता फडणवीस यांचा व्हिडिओ पाठवून दुसऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने याची मोठी चर्चा होत आहे. या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. नेमका प्रकार तपासात पुढे येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

'आयएएस' महिलेचा विनयभंग: राजधानी दिल्लीत महिला IAS अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 20 मे, 2023 रोजी एका IRS अधिकाऱ्याला अटक केली आहे. महिला आयएएस अधिकाऱ्याचा आरोप आहे की, आरोपी तिला जवळपास 3 वर्षांपासून त्रास देत होता. माहितीनुसार, कोरोनाच्या काळात महिला आयएएस अधिकाऱ्याची ड्युटी लागली होती. या दरम्यान आरोपीची पीडितेसोबत ओळख झाली. तेव्हापासून तो तिला सतत त्रास देत होता.

बऱ्याच काळापासून त्रास देत होता: पीडित आयएएस ऑफिसरने आरोप केला आहे की, आरोपी तिला खूप दिवसांपासून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. तिने त्याला अनेक वेळा समजावून सांगून ताकीदही दिली होती. असे असूनही तो ते ऐकता तिला वारंवार फोन करत होता. यानंतर महिला अधिकाऱ्याने पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, पाठलाग आणि धमकावल्याची तक्रार केली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अधिकाऱ्याला अटक केली आहे. सोहेल मलिक असे आरोपीचे नाव आहे. तर महिला अधिकारी केंद्रीय मंत्रालयात सहसचिव पदावर कामाला आहेत. विशेष म्हणजे पीडित आयएएस ऑफिसरचा पतीही एक आयएएस अधिकारी आहे.

हेही वाचा:

  1. Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए अधिकारी नागपुरात दाखल
  2. HSC Results 2023 : बारावीचा निकाल जाहीर, 'असा' करा चेक
  3. 12th Result : बारावीचा निकाल जाहीर; यावर्षीही कोकण विभाग नंबर वन, निकालात मुलांपेक्षा मुली ठरल्या भारी

ABOUT THE AUTHOR

...view details