महाराष्ट्र

maharashtra

Accident On Satara Highway: सातारा महामार्गावर कारचा भीषण अपघात, एअर बॅगमुळे वाचले चौघांचे प्राण

By

Published : Sep 26, 2022, 4:59 PM IST

Updated : Sep 26, 2022, 9:21 PM IST

Etv Bharat

सातारा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये गाडी थेट डीव्हायडरला धडकली आणि थेट दुसऱ्या लेंनमध्ये शिरली. (Accident On Satara Highway) सुदैवाने दुसऱ्या लेनमधून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला. कारमधील एअर बॅग वेळीच उघडल्याने यातील प्रवाशांचे जीव वाचले आहेत. प्रवाशांचा मात्र एका क्षणाला काळजाचा ठोका तुटला

पुणे - सातारा महामार्गावर असणाऱ्या शिंदेवाडी गावाजवळ सकाळच्या सुमारास पाऊस येत होता त्यामुळे कारचालकला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहन थेट डीव्हायडरला जाऊन धडकले. दोन पलटी खाऊन ती कार थेट दुसऱ्या लेन्मध्ये जाऊन उभी राहिली. तिथे कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला. मात्र, सर्व प्रवाशांनी एअर बॅग उघडल्याने प्रवाशांचा जीव वाचला.

सातारा महामार्गावर कारचा भीषण अपघात

या कारमधून चार प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात कारचे बोनेट, दरवाजा यांना जबर फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. एअरबॅग जर वेळीच उघडले नसते, तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. या अपघातानंतर कारची झालेली अवस्था पाहून कारमधील प्रवासीही हादरुन गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले.

सातारा महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून ती अपघातग्रस्त कारा बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

Last Updated :Sep 26, 2022, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details