महाराष्ट्र

maharashtra

तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना संस्कृतमधून पत्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 2:33 PM IST

Sushma Andhre letter to Nilam Gorhe : ललित पाटील प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांना उपसभापती सभागृहात बोलू देत नाहीत, या आशयाचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रसिद्ध केला होता. यावरुन त्यांनी माफी मागावी असं उपसभापती नीलम गोऱ्हेंनी म्हटलं होतं. यानंतर सुषमा अंधारेंनी त्यांना संस्कृतमधून पत्र लिहिलंय.

Sushma Andhre letter to Nilam Gorhe
Sushma Andhre letter to Nilam Gorhe

पुणे Sushma Andhre letter to Nilam Gorhe : ललित पाटील प्रकरणात उपसभापती आमदार रवींद्र धंगेकरांना बोलू देत नाही, या आशयाचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. यानंतर सत्ताधारी आमदारांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अधिवेशनात हक्कभंग आणण्याची मागणी केलीय. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उपसभापती यांना प्रस्ताव दिलेला आहे.

तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही : या प्रस्तावावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांचं मत मांडलं. आठ दिवसांत माफी मागावी अन्यथा सुषमा अंधारे यांच्यावर हकभंग प्रस्ताव मंजूर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सुषमा अंधारे यांनी आता संस्कृत मधून नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिलंय. एकवेळ तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही अशा प्रकारचं पत्र त्यांनी लिहिलंय. त्यामुळं सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे यांच्यातील शाब्दिक वॉर आणखीनच वाढणार असल्याचं दिसतंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून शिंदे गटात गेल्यानंतर सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे यांच्यात रोजच राजकीय खडाजंगी होत असते.



संस्कृत भाषेतच पत्र का : भारतातील वेद, उपनिषद, सगळ्या प्रथा, परंपरा या संस्कृतमध्ये लिहिलेल्या आहेत. रोज उठून हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडून गेल्याचं सांगणाऱ्या गद्दारांना मग हिंदुत्वाची संस्कृत भाषा समजत असेल. त्यामुळंच हे पत्र संस्कृत भाषेत लिहिल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलंय. जर त्यांना ही भाषा समजत नसेल तर तो त्यांचा दोष असल्याचंही सुषमा अंधारेंनी म्हटलंय. यांसंदर्भात त्यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केलीय.


हेही वाचा :

  1. नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना अल्टिमेटम
  2. ललित पाटील ड्रग्स प्रकरण; सुषमा अंधारेंना नाशिकहून पत्र, अनेक राजकीय नेत्यांची नावं पत्रात असल्याचा अंधारेंचा दावा
  3. Shambhuraj Desai On Sushma Andhare : ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंनी वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा...- शंभूराज देसाई
  4. Sushma Andhare : उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखात्याच्या वापर.... ; सुषमा अंधारेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details