महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray little Fan : राज ठाकरेंनी दुर्धर आजारग्रस्त चिमुकल्याची 'ती' इच्छा केली पूर्ण; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 5:40 PM IST

दापोडीतील मनसे कार्यकर्ते विशाल देशपांडे यांचा मुलगा राज देशपांडे याला राज ठाकरे यांना भेटायची इच्छा होती. राज हा एका दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहे. या चिमुकल्या राजची इच्छा समजताच राज ठाकरे स्वतः त्याला घरी भेटायला आले.

Raj Thackeray little Fan
राज ठाकरे पोहोचले कार्यकर्त्यांच्या घरी

फॅनच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले कार्यकर्त्यांच्या घरी

पुणे (पिंपरी-चिंचवड) : नेहमी कणखर असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जरा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होते दापोडीतील मनसेचे कार्यकर्ते विशाल देशपांडे यांच्या मुलाला म्हणजेच राज देशपांडे याला राज ठाकरे स्वतः घरी भेटायला आले. राज हा एका दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहे. त्याने त्याचा वडिलांकडे राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज या चिमुकल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे स्वतः घरी आले. या चिमुकल्याला पाहून राज ठाकरे जरा भावूक झाल्याचे दिसून आले.

मुलाचा भेटीचा हट्ट पूर्ण : "मस्कुलर अट्रॉफी" या आजाराने त्रस्त असलेल्या रिक्षा चालक कार्यकर्त्याचा मुलगा राजचा हट्ट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूर्ण केला. कार्यकर्त्याच्या दापोडी येथील घरी जात ठाकरे यांनी मुलाची भेट घेतली. स्वत: खरेदी करुन त्याच्यासाठी खेळणी आणि खाऊ आणला. ठाकरे यांनी मुलाचा भेटीचा हट्ट पूर्ण केल्याने देशपांडे कुटुंबीयांना आनंद गगनात मावेनासा झाला.

राज ठाकरे यांना भेटण्याची होती इच्छा: दापोडीत वास्तव्यास असलेले विशाल देशपांडे हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या अगोदरपासून ते राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. कंपनीतील नोकरीनंतर ते आता रिक्षा चालवतात. देशपांडे यांना राज नावाचा मुलगा आहे. तीन महिन्यांपूर्वी या मुलाला 'मस्कुलर अट्रॉफी' या आजाराचे निदान झाले. मुलाची राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्याने वडिलांकडे तसा हट्ट धरला.

राज ठाकरे यांनी केली स्वाक्षरी : मनसेच्या पदाधिका-यांनी विशाल देशपांडे यांच्या मुलाच्या आजाराची आणि त्याची भेटण्याची इच्छा राज ठाकरे यांनी सोमवारी कळविली. त्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज ठाकरे हे विशाल यांच्या घरी आले. मुलासाठी स्वत: खरेदी करुन खेळणी आणली. त्याच्यासाठी खाऊ आणला. त्याच्यासोबत १५ ते २० मिनिटे गप्पा मारल्या. मुलाने पांढरा झब्बा घातला होता. त्यावर राज ठाकरे यांनी प्रिय राज असे लिहित स्वाक्षरी केली. ठाकरे यांनी घरी भेट देत इच्छा पूर्ण केल्याने देशपांडे कुटुंबीयांना आनंद झाला.


एरोप्लेनमध्ये जाण्याची इच्छा :‘राज ठाकरे' हे आमच्यासाठी विठ्ठल आहेत. मी माझ्या मुलाचेही नाव राज ठेवले आहे. मुलाने राज साहेबांना भेटण्याचा हट्ट धरला होता. याबाबत साहेबांना माहिती मिळताच त्यांनी घरी येत मुलाचा हट्ट पूर्ण केला. विठ्ठलाचे पाय माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या घराला लागले. विठ्ठलच आम्हाला भेटायला आल्याने आनंद झाला अशी प्रतिक्रिया विशाल देशपांडे यांनी दिली. यावेळी याठिकाणी मनसे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या छोट्या राजची एरोप्लेन मध्ये जाण्याची देखील इच्छा आहे.

हेही वाचा -

  1. Raj Thackeray News: रस्ते करताना सरकारला भीती वाटेल असे आंदोलन करा - राज ठाकरे
  2. Raj Thackeray News: भाजपासोबत जाणारे गाडीत झोपून जातात- राज ठाकरेंचा अजित पवार यांना टोला
  3. Raj Thackeray Konkan visit : फोडाफोडीचे राजकारण आम्हाला मान्य नाही, राज ठाकरेंचा भाजपला टोला

ABOUT THE AUTHOR

...view details