ETV Bharat / state

Raj Thackeray News: भाजपासोबत जाणारे गाडीत झोपून जातात- राज ठाकरेंचा अजित पवार यांना टोला

author img

By

Published : Aug 16, 2023, 1:40 PM IST

Updated : Aug 16, 2023, 2:45 PM IST

राज ठाकरेंचा अजित पवार यांना टोला
Raj Thackeray New

मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. पनवेल येथील कोकणातील पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसैनिकांना विविध प्रश्नावर आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत.

नवी मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई गोवा महामार्ग तसेच राज्यातील रखडलेल्या रस्ते प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला हिरवा कंदील दाखवताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, आंदोलन असे करा की सरकारला यापुढे निकृष्ट रस्ते करताना भीती वाटायला पाहिजे. पनवेल येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपासह महाविकास आघाडीवरदेखील हल्ला चढविला. मात्र चंद्रावर यान सोडण्यापेक्षा महाराष्ट्रात सोडले असते तर खर्च वाचला असता, असा टोलादेखील राज ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खड्ड्यांचा राज्य आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच हजार लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. १६ हजार ६०० कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा अद्याप हा रस्ता पूर्ण झालेला नाही. हा रस्ता 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत जनतेने त्रास का सहन करायचा असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पनवेल येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी केवळ मुंबई गोवा महामार्ग नाही तर राज्यातील सर्व रस्ते हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आहे. रस्ते बांधणे हा राजकारण्यांचा धंदा आहे. त्याशिवाय त्यांना टक्के मिळत नाहीत. त्यांचे राजकारण चालत नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. नुकतेच सरकारने चंद्रयान सोडले आहे.

या लोकांना धडा शिकवा- 2008 मध्ये मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होऊनही रस्ता पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेला आहे. समृद्धी महामार्गावर सुद्धा ४५० दिवसांमध्ये ३५० लोक मृत्युमुखी पडले आहेत, असे असतानाही त्याच लोकांना पुन्हा निवडून दिले जात आहे. त्याच लोकांना पुन्हा मतदान कसे केले जाते हे मला आश्चर्य वाटते रस्ते वाहतूक व शाळा प्रवेशाबाबत नागरिकांना अडचणी येत असतानाही त्याच लोकांना निवडून दिले जात आहे. जर तुम्हाला हेच हवे असेल तर तुम्हाला हे सर्व लखलाभो. मात्र, हे बदल हवे असतील तर एकदा संधी द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.

नाणार गेल्यानंतर बारसू का? - नाणारचा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर लगेच बारसूचा प्रकल्प पुढे करण्यात आला. कोकणाचे सौंदर्य घालवण्यासाठी हे लोक टपून बसलेले आहेत. कोकणी बांधवांनी चिरीमिरीसाठी आपल्या जमिनी विकल्या आहेत. पाच हजार एकर जमीन विकण्यात आली आहे. बाकीच्या राज्यांमध्ये जमिनी विकल्या जात नाहीत. महाराष्ट्रातील जमिनी कशा विकल्या जातात?

अगदी शेजारच्या गोवा राज्यातही जर तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर त्या ठिकाणी शेतीच करावी लागते. आम्ही उत्तरेतील लोकांना जमिनी देणार नाही, असे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. गोव्याचे छत्तीसपूर किंवा गुरगाव होऊ देणार नाही. कोण जमिनी पळवते याकडे लक्ष द्या. कोकणाचे सौंदर्य राखून उद्योग यावेत- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे

भाजपाने पक्ष उभा करायला शिकावे- राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या टोल आंदोलनाबाबत भाजपाने केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अमित ठाकरे यांनी आधी रस्ते करायला व टोल बांधायला शिकावे, असे भाजपाने म्हटले होते. या संदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, भाजपाने आधी दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला शिकावे. मानेवर बंदूक ठेवून पक्षात प्रवेश द्यायचे. मग प्रवेश दिलेले आमदार गाडीत झोपून जातात. वर म्हणतात मी त्या गाडीत नव्हतो, हे अतिशय निर्लज्जपणाचे आहे, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांच्यावरही टोला लगावला. जे आता खोके-खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर आहेत. त्यांनी कोविडमध्येही पैसे कमावणे सोडले नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

हेही वाचा-

  1. Vijay Wadettiwar on Ajit Pawar: अजित पवार-शरद पवारांच्या भेटीमागे पंतप्रधानांची 'ती' अट- विजय वडेट्टीवार यांचा दावा
  2. Maharashtra political stir : काका-पुतण्याच्या भेटीमुळे राजकारण तापले! ठाकरे गटासह काँग्रेसकडून बैठकांचे सत्र
Last Updated :Aug 16, 2023, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.