महाराष्ट्र

maharashtra

पेट क्लिनिकमध्ये श्वानाचा गळफास लागून मृत्यू; दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 1:48 PM IST

Updated : Nov 23, 2023, 2:08 PM IST

Dog Hanged in Pet Clinic : पुण्यात लसीकरणासाठी पेट क्लिनिकमध्ये आणलेल्या श्वानाचा गळफास लागून मृत्यू झालाय. याप्रकरणी पुण्यतील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Dog Hanged in Pet Clinic
Dog Hanged in Pet Clinic

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे

पुणे Dog Hanged in Pet Clinic : लसीकरणासाठी पेट क्लिनिक मध्ये आणलेल्या श्वानाचा गळफास लागून मृत्यू झालाय. याप्रकरणी दोन डॉक्टरासंह चौघांविरुद्ध पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास पाषाण इथल्या पेट क्लिनिकमध्ये घडलीय. याप्रकरणी पाषाण लिंक रोड येथील 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिलीय. त्यानुसार पोलिसांनी डॉ. सजींव राजाध्यक्ष (60), डॉ. शुभम राजपुत (35) आणि दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात 22 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केलाय.

गळ्याला पट्टा घट्ट बसल्यानं श्वानाचा मृत्यू : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराजवळ हनी नावाचा लॅब्रोडोर जातीचा श्वान होता. त्याचं वार्षिक लसीकरण आणि नेल्स ट्रीमींग करण्यासाठी एका पेट क्लिनिकमध्ये घेऊन गेले होते. श्वानाच्या मालकांनी त्याला डॉक्टरांच्या ताब्यात दिलं होतं. यानंतर डॉ. राजपुत आणि त्यांच्या दोन मतदनीसांनी त्या श्वानाला त्यांच्याकडील पट्ट्यानं झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, राजपुत यांनी लावलेला त्यांच्याकडील पट्टा हा श्नानाच्या गळ्याला घट्ट बसला. त्यामुळं श्वान खाली कोसळलं. त्याला उपचारासाठी डॉक्टर क्लिनिकमध्ये घेऊन गेले असता पंधरा मिनिटांनी डॉक्टरांनी फिर्यादींना त्यांच्या श्वनाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन्ही डॉक्टर श्वानाच्या मृत्यूबाबत फिर्यादींना काही न बोलता तेथून पसार झाले. फिर्यादींचा श्वान चाळीस दिवसाचा असल्यापासून तो बारा वर्षाचा होईपर्यंत त्यांच्याकडे होता. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी थेट चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिलीय.



डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल : याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितलं की, आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर आम्ही जेव्हा संबंधित डॉक्टरांच्याकडे याप्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावलं असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसंच गळ्याला फास लागल्यानं श्वानाचा मृत्यू झाला असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे कलम 429 प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस अधिकारी पांढरे यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. भटका कुत्रा चावल्यास १० हजार रुपयांची भरपाई, मुंबईचे प्राणीमित्र म्हणतात अशाने समस्या सुटणार का?
  2. Varanasi Street Dog Reaches Abroad : वाराणशीच्या जयाला नेण्याकरिता नेदरलँडची तरुणी भारतात, सहा महिन्यानंतर होणार रवाना
  3. Assam Stray Dog Issue : विषयच खोल...महाराष्ट्राच्या आमदारामुळे चक्क आसामच्या अधिवेशनात गदारोळ
Last Updated :Nov 23, 2023, 2:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details