ETV Bharat / bharat

Varanasi Street Dog Reaches Abroad : वाराणशीच्या जयाला नेण्याकरिता नेदरलँडची तरुणी भारतात, सहा महिन्यानंतर होणार रवाना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 9:34 AM IST

Varanasi Street Dog Reaches Abroad : वाराणसीच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या मादी कुत्र्याला विदेशात घर मिळालय. जया या मादी कुत्र्याला नेदरलँडमध्ये नेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बऱ्याच कालावधीनंतर या मादी कुत्र्याला फीट टू फ्लायचं प्रमाणपत्र मिळालंय.

Varanasi Street Dog Reaches Abroad
Varanasi Street Dog Reaches Abroad

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच पलटलं नशीब

वाराणसी Varanasi Street Dog Reaches Abroad : धर्म आणि अध्यात्माची नगरी असलेल्या काशीच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या दोन मादी कुत्र्यांचं नशीब बदललंय. वाराणसीच्या गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या दोन भटक्या कुत्र्यांना विदेशात जाण्याची संधी मिळालीय. इतकंच नाही तर त्यांना परदेशात नेण्यासाठी त्यांचे पासपोर्टही तयार करण्यात आले आहेत. जया आणि मोती अशी या दोन कुत्र्यांची नावं आहेत. यातील मोती आधीच परदेशात गेला आहे. नेदरलँडहून मिरल ही तरुणी जयाला घ्यायला काशी इथं आली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयाला फीट टू फ्लायचं प्रमाणपत्र मिळालं आहे.

फीट टू फ्लाय सर्टिफिकेट सापडलं : वाराणसीच्या रस्त्यावर विदेशी नागरिकांना जया आणि मोती या मादी कुत्र्या सापडल्या होत्या. दोघांची परिस्थिती अशी होती की त्यांना कोणीही त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकत नव्हतं, पण दोघांचं नशीब असं चमकलं की, आता कुत्रे परदेशात राहायला जाणार आहेत. मोतीला त्यांनी आधीच परदेशात घेऊन गेले आहेत. यांनतर आता तब्बल 6 महिन्यांनंतर जयालाही वाराणसीबाहेर जाण्याची संधी मिळालीय. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयाला 'फीट टू फ्लाय' प्रमाणपत्र मिळालंय. यानंतर आता जया काशीहून नेदरलँडला रवाना होणार आहे. त्यासाठी नेदरलँडची रहिवासी मीरल स्वतः वाराणशीला पोहोचली आहे. जया ही श्वान 31 ऑक्टोबरला नेदरलँडच्या अ‍ॅमस्टरडॅमला जाणार आहे.

  • जयाचं सर्व प्रकारचं लसीकरण : एनीमोटेल केअर ट्रस्टचे सीईओ संदीप सेन यांनी सांगितलं की, जयाला शोधून तिची सुटका करण्यात आली. सर्वप्रथम आम्ही जयाचं सर्व लसीकरण करून घेतलं. सेव्हन इन वन, अँटी रेबीज, जंतनाशक आणि मायक्रोचिपची प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर जयाचं ब्लड सीरम मीरलच्या देशात पाठवण्यात आलं, जेणेकरून तेथून जयाला रेबीजची लक्षणं नसल्याची खात्री केली.

आंतरराष्ट्रीय फिटनेस सर्टिफिकेट दिल्लीत मिळणार : संदीप सेन म्हणाले की, जयाला घेण्यासाठी मीरलच्या नेदरलँडकडून हिरवा सिग्नल मिळालाय. जयाला घेण्यासाठी मीरलही वाराणसीला आलीय. मीरल आणि जया 26 ऑक्टोबरला दिल्लीला गेल्यानंतर तिथ क्वारंटाइन ऑफिसमध्ये जाऊन अंतिम आंतरराष्ट्रीय फिटनेस प्रमाणपत्र घ्यावं लागेल. त्यानंतर 31 ऑक्टोबरच्या रात्री त्यांचं नेदरलँड्ससाठी विमान आहे. तिथून मीरलसोबत तिच्या देशात जाईल. जयाला नेण्यासाठी वाराणसीहून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. Sexual Assault With Dog : धक्कादायक! सिक्युरिटी केबिनमध्ये सुरक्षा रक्षकाचाच भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार
  2. Army Dog Kent : दहशतवाद्यांशी चकमकी दरम्यान सैन्याच्या श्वानाचं सर्वोच्च बलिदान
  3. International Dog Day 2023 : आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस 2023; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.