महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी देणं चुकीचं, आमदार अपात्रता सुनावणीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचं मत

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 11:47 AM IST

Prithviraj Chavan on MLA Disqualification : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आज महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आज शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर आपला निर्णय देणार आहेत. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

Prithviraj Chavan on MLA Disqualification
Prithviraj Chavan on MLA Disqualification

पक्षांतर कायद्यात बदल करायला हवा

पुणे Prithviraj Chavan on MLA Disqualification : एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वात मोठी घडामोड असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सायंकाळनंतर निकाल देणार आहेत. या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली मत व्यक्त केलंय.

अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय : आजच्या निकालाच्या अनुषंगानं बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "आजच्या निकालाचे दोन भाग करावे लागणार आहेत. पहिली बाब म्हणजे घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवं. आजचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल. घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा 1985 मध्ये आला. 2003 मध्ये यात आमुलाग्र बदल करण्यात आले. पण असे असताना या कायद्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलायला हवं असं माझं वैयक्तिक मत आहे. कायदेशीर बाब जर आपण बघितली तर शिवसेनेच्या 16 आमदारांनी पक्षांतर बंदी केलेली आहे. या 16 आमदारांची आमदारकी रद्द केली पाहिजे. त्यांचं मंत्रीपददेखील रद्द केलं पाहिजे. ही कायदेशीर बाब झाली."

16 आमदार अपात्र झाले तर राजकीय भूकंप येईल :विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "या सर्व घटनाक्रमात अध्यक्ष म्हणून ज्याची नेमणूक झाली ते विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात. ते त्या पक्षाचं हित बघणार नाहीत, असं होणार नाही. अध्यक्षांकडे जबाबदारी देणं हेच चुकीचं आहे. म्हणून पक्षांतर बंदी कायदा बदलला पाहिजे. राजकीय बाजू जर बघितली तर हे 16 आमदार जर अपात्र होऊन त्यांचे पद गेले तर राजकीय भूकंप होईल."

आज देणार निकाल :शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, तीन महिन्यांच्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत.

हेही वाचा :

  1. काही तासांत येणार शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल; निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
  2. एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर भेट : उद्धव ठाकरे गटाची 'या'साठी सर्वोच्च न्यायालयात धाव
  3. आजचा निकाल कसा असेल? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं!

ABOUT THE AUTHOR

...view details