ETV Bharat / state

एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर भेट : उद्धव ठाकरे गटाची 'या'साठी सर्वोच्च न्यायालयात धाव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 9:22 AM IST

Shivsena MLA Disqualification Verdict
संपादित छायाचित्र

Shivsena MLA Disqualification Verdict : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल देणार आहेत. मात्र 7 जानेवारीला एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यात झालेल्या भेटीवर उबाठा गटानं आक्षेप घेतला आहे.

नवी दिल्ली Shivsena MLA Disqualification Verdict : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर 20 जून 2022 मध्ये सरकार पडलं होतं. त्यानंतर या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लवादाकडं सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात झालेल्या भेटीमुळं उबाठा गटात मोठी नाराजी पसरली आहे. उबाठा गटानं या भेटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत यामुळं निकाल प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर भेट रेकॉर्डवर येण्यासाठी उबाठा गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर भेटीवर आक्षेप : उबाठा गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. या याचिकेत त्यांनी "एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांची 7 जानेवारीला वर्षा निवास्थानी बैठक झाली. ही बैठक चिंताजनक आहे. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहेत. त्यामुळं निकालाच्या तीन दिवस अगोदर ही भेट घेणं आक्षेपार्ह आहे" असं नमूद केलं आहे.

विधानसभा अध्यक्षांनी निष्पक्ष काम करणं गरजेचं : विधानसभा अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या वर्तनानं विरोधकांच्या मनातही आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मात्र आमदार अपात्रता प्रकरणी तीन दिवसांवर सुनावणी असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. अशी भेट घेणं हे अयोग्य आहे. दहाव्या अनुसूचीनुसार निर्णय घेणारे अधिकारी म्हणून विधानसभा अध्यक्षांनी निःपक्षपातीपणे काम करणं आवश्यक आहे,” असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

भेट आक्षेपार्ह असल्यानं रेकॉर्डवर ठेवावी : "विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणं हे आक्षेपार्ह आहे. ही भेट कायद्याचं उल्लंघन करणारी आहे" अशी बाजू उबाठा गटाचे वकील निशांत पाटील आणि राजेश इनामदार यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद केलं आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनात ही बाब आणून देणं गरजेचं आहे. या महत्वाच्या घडामोडी रेकॉर्डवर ठेवण्यात यावी, असंही त्यांनी या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. आमदार अपात्र प्रकरणी हालचालींना वेग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि DGP यांच्यात झाली बैठक
  2. काही तासांत येणार शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल; निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.