महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांकडे कोल्हापुरात निवडून येण्याची क्षमता नाही-शरद पवारांचा टोला

By

Published : Jan 16, 2023, 8:12 AM IST

Updated : Jan 16, 2023, 12:40 PM IST

पुण्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार यांनी अनेक विषयांवर उत्तरे दिली आहेत. नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवर, तसेच चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमध्ये निवडणूक लढवण्यावर शरद पवारांनी भाष्य केले.

sharad pawar chndraknt patil
शरद पवार चंद्रकांत पाटील

पुण्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद

पुणे : चंद्रकांत पाटील हे फार सर्वशक्तीमान आहेत. ते त्यांचे कोल्हापूर सोडून इकडे पुण्यामध्ये कोथरूडला निवडणूक लढवायला आले. नेमके त्यांचे कोथरूडसाठी योगदान तरी काय? असा सवाल शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला आहे. ज्या माणसामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नाही. त्याच्यावर काय भाष्य करावे असे खडे बोलदेखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहेत.

शरद पवार यांनी सुनावले खडे बोल : चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री झाल्यापासून सातत्याने पुणे जिल्हा, कोणाचीही मक्तेदारी नाही पुणे जिल्हा हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. अशा प्रकारची वक्तव्य करतात, यावर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीवर भाष्य : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरदच पवार पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्याने अनेक विषयावर चर्चा केली आहे. नाशिकच्या सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवर माझ्याशी काही चर्चा झालेली नाही. परंतु हा प्रश्न काँग्रेसने बसून मिटवला असता तर मिटला असता, आता हे मिटू शकतो असं म्हणत शरद पवार यांनी या सगळ्या प्रकरणांमध्ये सस्पेन्स निर्माण केला आहे.

चर्चा करून प्रश्न मिटवावेत :अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचे काय बोलणे झाले माहित नाही. पण बाळासाहेब थोरात यांनी बसून जर हे सगळे प्रश्न मिटवले असते. जे काही झाले ते योग्य नाही. परंतु बाळासाहेब थोरात एवढे आक्रमक नाहीत. त्यांनी ते मिटवले पाहिजे होते. आताही मिटवू शकतात, असे मला वाटते. पण ते आता सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षावर अवलंबून असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडवणीस यांना श्रेय घ्यायचे : काँग्रेस अंतर्गत वाद झाला. त्याचे श्रेय जर कोणाला घ्यायचे असेल म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात आहे. परंतु मला या संदर्भात काही माहिती नाही आणि आताही बाळासाहेब थोरात काँग्रेस आणि महाविकास आघाडी बसून हा प्रश्न मिटवतील, असे मला वाटते. पण देवेंद्र फडवणीस यांना श्रेय घ्यायचे आहे. अशा चर्चा होत असतात. असे म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.

हेही वाचा :Ajit Pawar Elevator Accident : अजित पवारांच्या लिफ्टचा अपघात; चौथ्या मजल्यावरून कोसळली

Last Updated : Jan 16, 2023, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details