बारामती - विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची लिफ्ट चौथ्या मजल्याल्यारुन कोसळ्याची घटना घडली आहे. या बाबत स्वत:ल अजित पवार यांनी माहिती दिली. 14 जानेवारी रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना झाल्याचे पवार म्हणाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही. काल एका रूग्णालयात गेले होतो त्यावेळी चौथ्या मजल्यावर लिफ्टने जात असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली. सुदैवाने आम्ही वाचलो नाही तर, आजच श्रद्धांजलीचां कार्यक्रम घ्यावा लागला असता, असे अजित पवार यांनी सांगितले. काल दिवसभर मी याबद्दल कोणालाच सांगितले नाही. पण, तुम्ही माझ्या घरचे आहात म्हणून मी तुम्हाला आज सांगत आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली - मी काल दिवसभरात दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. दुसऱ्या हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जाणार जात असतांना अचानक लाईट गेली. त्यामुळे थेट लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक होता. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यामुळे घरातील कोणालाच सांगितले नाही. याबाबत मी काल मीडियाला माहिती दिली नाही. आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तुम्हा सर्वांचे आभार, मला काहीही झाले नाही. अशा घटना घडतात. या घटनेनंतर मी काहीही घडले नसल्याचे भासवत घरी परतलो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग - दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना अचानक त्यांच्या साडीला आग लागली. आग वेळीच आटोक्यात आल्याने सुळे थोडक्यात बचावल्या. सुळे म्हणाल्या की, 'उद्घाटनाच्या वेळी माझ्या साडीला आग लागली. सर्व हितचिंतक, नागरिक, पक्ष कार्यकर्ते की मी सुखरुप असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.'
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - सुळेच्या साडीला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करीत असतांना ही घटना घडली. या अपघातात सुप्रिया सुळे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. साडीला आग लागल्याचे समजताच त्यांनी ती विझवली.