महाराष्ट्र

maharashtra

Mauli Palkhi : यंदाही आळंदी माउलींच्या रथाची धुरा 'सर्जा-राजा'कडे; भोसले कुटुंबाला मिळाला मान

By

Published : May 9, 2023, 10:35 PM IST

sarja raja
माउलींच्या रथाची धुरा यंदा सर्जा राजाकडे

ज्ञानेश्ववर माऊलींचा पालखी सोहळ्याला 11 जूनला सुरुवात होणार आहे. या पालखीचा रथ ओढण्याचा मान देवाच्या आळंदी मधल्या भोसले कुटुंबाच्या ‘सर्जा राजा’ बैलजोडीला मिळाला आहे.

माहिती देताना विनया भोसले

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 192 वा पालखी सोहळा येणाऱ्या 11 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी आळंदीत पाहायला मिळत आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबातील सर्जा- राजा या बैलजोडीला विशेष मान मिळाला आहे. या अगोदर देखील दोन वेळेस भोसले कुटुंब या विशेष मानाचा मानकरी ठरलेले आहे. सर्जा-राजा हे खिलार जातीची बैलजोड असून कर्नाटक येथून त्यांना साडेतीन लाख रुपयात भोसले कुटुंबाने विकत घेतले आहे. यावर्षी भोसले कुटुंबाला मिळालेल्या मानामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी आहेत.



पालखी पंढरपूरकडे प्रस्थान: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 192 वा पालखी सोहळा येणाऱ्या 11 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या आषाढी वारीसाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या सोहळ्यासाठी येतात, ते धार्मिक वातावरणात रमून जातात. ज्ञानोबा माऊली तुकाराम गजरात अवघी आळंदी दुमदुमून जाते. या सोहळ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे.

सर्ज-राजा बैल जोडीला विशेष मान:यावर्षी माऊलींचा रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाच्या सर्ज-राजा बैल जोडीला विशेष मान मिळाला आहे. या सर्जा-राजाला बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करत आहेत. या सर्जा-राजाची विशेष काळजी भोसले कुटुंब घेत आहे. दोन्ही जोडी निवडताना भोसले कुटुंबाने विशेष काळजी घेतली. माऊलींचा रथ आणि बैलगाडी ओढण्यासाठी लागणारी ताकद बघून ही सर्जा राजाची बैलजोडी विकत घेतली आहे. या बैलाची भोसले कुटुंबातील महिला देखील काळजी घेतात. तसेच सोहळ्यापर्यंत कुटुंबियांकडून सर्जा-राजाची सेवा, त्यांचा खुराक यांची विशेष काळजी घेतली जाते.

हेही वाचा -

  1. Ashadhi Wari 2022 पालखी सोहळ्यात वारकरी झाले दंग जाणून घ्या संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा इतिहास
  2. Palkhi Ringan Sohala वैष्णवांच्या दाटीत दौडले अश्व चांदोबाचा लिंबमध्ये पार पडले डोळ्याचे पारणे फेडणारे पहिले उभे रिंगण
  3. Ashadhi Wari 2022 संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात कधी झाली वाचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details