महाराष्ट्र

maharashtra

Fired For Terror : दहशतीसाठी गोळीबार करणारे चौघे जेरबंद ; पुण्यातील दोन दिवसातील दुसरी घटना

By

Published : Nov 27, 2022, 10:18 AM IST

पुण्यातील लोहगांव परिसरात दहशतीसाठी गोळीबार करणार्‍या चौघांना विमानतळ पोलिसांनी सहा तासाच्या आत अटक केली (police arrested people who fired in Pune) आहे. या टोळक्याने हवेत तीन गोळ्या झाडल्या. ही पुण्यातील दोन दिवसातील दुसरी घटना (police arrested people who fired for terror) आहे.

airport police arrested four people
दहशतीसाठी गोळीबार करणारे चौघे जेरबंद

पुणे : पुण्यातील लोहगांव परिसरात दहशतीसाठी गोळीबारकरणार्‍या चौघांना विमानतळ पोलिसांनी सहा तासाच्या आत अटक केली (police arrested people who fired in Pune) आहे. या टोळक्याने हवेत तीन गोळ्या झाडल्या. ही पुण्यातील दोन दिवसातील दुसरी घटना (police arrested people who fired for terror) आहे.

दहशतीसाठी गोळीबार करणारे चौघे जेरबंद, घटना सीसीटीव्हीत कैद

पिस्तूल जप्त :नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय.22,रा.खेसे वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त करण्यात आले (people who fired for terror) आहे.

दहशत पसरवण्याचा प्रयत्न :कोरेगाव पार्कमध्ये दोन गटातील वादातून गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री लोहगावात दोन ठिकाणी गोळीबार करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारुच्या नशेत आपण भाई असल्याचे सांगत एका टोळक्याने हे कृत्य केले. याप्रकरणी, विमातळ पोलिसानी चौघांच्या विरुद्ध दहशत पसरवणे आणि आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस कर्मचारी प्रभाकर देवकाते (वय.32) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास तुकाराम महाराज मंदीर चौक व गणपती चौक लोहगाव परिसरात घडली (Fired For Terror) होती.

गोळीबार केल्याची कबुली :चौघे आरोपी शुक्रवारी रात्री ते दारु पिले. यानंतर आपणच परिसरातील भाई आहोत, आपला परिसरात वट पाहिजे अशी त्यांची चर्चा झाली. यानंतर ते संत तुकाराम चौकात दुचाकीवरुन आले. तेथे नितीन सकट याने पिस्तूल बाहेर काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या. तेथे उपस्थितांना धमकावत कोणी आमच्या वाट्याला गेले तर आम्ही एक एकाला गोळ्या घालू. कोणालाही जीवंत सोडणार नाही, असा दम भरला. त्यानंतर ते दुचाकीवरुन गणपती चौकात गेले. तेथे सकटने पुन्हा एकदा हवेत गोळी झाडली. तेथेही आरडा ओरडा करत नागरिकांना दमदाटी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केल्याची त्यांनी कबुली (airport police) दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details