ETV Bharat / state

Robbery in Satara : चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने सराफ व्यावसायिकाचे लुटले ५० तोळे सोने, ४० किलो चांदी, एकजण जखमी

author img

By

Published : Sep 26, 2022, 3:21 PM IST

तलवारीने हल्ला आणि बंदुकीतून गोळीबार करत चौघांनी सोने-चांदी व्यावसायिकाला लुटल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली (Thieves robbed gold and silver businessmen) आहे. या घटनेदरम्यान एका संशयिताला पकडण्यात यश आले असून लुटारूंच्या हल्ल्यात व्यावसायिकासह त्यांचा पुतण्या जखमी झाला (Thieves robbed by attacking in Satara) आहे.

Robbery in Satara
साताऱ्यात सोने चांदी व्यावसायिकाला लुटले

सातारा : तलवारीने हल्ला आणि बंदुकीतून गोळीबार करत चौघांनी सोने-चांदी व्यावसायिकाचे ५० तोळे सोने, ४० किलो चांदी आणि ७ लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथून समोर आली (Thieves robbed gold and silver businessmen) आहे. या घटनेदरम्यान एका संशयिताला पकडण्यात यश आले असून लुटारूंच्या हल्ल्यात व्यावसायिकासह त्यांचा पुतण्या जखमी झाला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्हा हादरून गेला (Thieves robbed by attacking in Satara) आहे.


सोने चांदी घेऊन घरी जाताना ऐवज लुटला - मलवडी येथील बसस्थानक परिसरात श्रीकांत तुकाराम कदम यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी साडे सातच्या सुमारास दुकानातील ४০ तोळे सोने, ५০ किलो चांदी आणि रोख ७ लाख रुपये असा ऐवज तीन पिशव्यांमध्ये भरून ते दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते.

पावणे आठच्या सुमारास अचानक एक जण गाडीसमोर आला. संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अजून तिघे जण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात धक्का दिल्यामुळे श्रीकांतचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली. गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या घेऊन तिघे जण त्यांच्या दुचाकीकडे पळाले, तर एकाने तलवारीने श्रीजितच्या हातावर आणि श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. त्या अवस्थेतही चुलत्या-पुतण्यांनी एका संशयिताला पकडून ठेवत आरडाओरडा केला.


चोरट्यांनी बंदुकीतून झाडल्या गोळ्या - एक साथीदार परत आला नसल्याचे लक्षात येताच एक जण दुचाकीवरून परत आला. त्याने बंदुकीतून चार गोळ्या (attacking with swords and firing guns) झाडल्या. गोळ्या चुकविताना त्यातील एक गोळी श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या संशयिताच्या पाठीला चाटून गेली. ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन चोरटे पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पकडलेल्या चोरट्यावर प्राथमिक उपचार करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अथीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. उर्वरित संशयितांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली असून सातारा जिल्हा हादरून गेला (Robberry in Satara) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.