महाराष्ट्र

maharashtra

Two Groups Fired : वाढदिवस साजरा केल्यानंतर वैमनस्यातून दोन गटात गोळीबार ; एक गंभीर जखमी

By

Published : Nov 25, 2022, 2:02 PM IST

कोरेगांव परिसरात वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्रीच्या सुमारास दोन गटात पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला (two groups fired due to animosity) आहे. याबाबत इम्रान हमीद शेख यांनी फिर्याद दिली (fired in Koregaon) आहे.

Two Groups Fired
कोरेगांव परिसरात दोन गटात पूर्ववैमनस्यातून गोळीबार

पुणे :पुणे शहरातील उच्चभ्रू असलेल्या कोरेगांव परिसरात वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्रीच्या सुमारास दोन गटात पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यातआला (After celebrating birthday two groups fired) आहे. याबाबत इम्रान हमीद शेख यांनी फिर्याद दिली (fired in Koregaon) आहे.

कोरेगांव परिसरात दोन गटात पूर्ववैमनस्यातून गोळीबार


हवेत गोळीबार :फिर्यादी हे त्यांचे मित्र नामे सागर कोळनट्टी, विवेक नवघरे, सागर गायकवाड, बबन इंगळे, मल्लेश कोळी, लॉरेन्स पिल्ले, गणेश पोळ, क्रीश सोनवणे यांचेसह त्यांचा मित्र रोहीत याचा गेरा लिजेंट प्रिमायसेस को-ऑप सोसायटीच्या ५ व्या मजल्यावरील हॉटेल रॉकवॉटर येथे वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पार्टी संपवून घरी जाण्यासाठी त्यांनी पार्क केलेल्या दुचाकी घेत असताना त्या ठिकाणी त्यांची वाट पहात असलेले आरोपी नामे सोन्या दोडमणी, नट्टी उर्फ रोहन निगडे, नितीन म्हस्के, धार आज्या व सोबतचे तीन ते चार लोक यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन मित्र सागर कोळनट्टी याला प्रथम हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी सोन्या दोडमणी याने त्याचेकडील कमरेला लावलेली बंदूक काढून त्यातून हवेत गोळीबार केला (two groups fired due to animosity) आहे.



आरोपींचा शोध सुरू :तसेच त्यांचेतील पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या व लांब केस असणाऱ्या इसमाने तेथील फुटपाथवर असलेल्या सीमेंटच्या प्लेवरब्लॉकने सागर कोनळट्टी याला खल्लास करु याला आज जिवंत सोडायचे नाही, असे बोलून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ७ ते ८ वेळा त्याचे तोंडावर, कपाळावर व डोक्यावर जोराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व त्यांचे मित्र बबन इंगळे, मल्लेश कोळी यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी करुन ते सर्वजण तेथून पळून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू (fired due to animosity in Koregaon) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details