महाराष्ट्र

maharashtra

विरार हत्या प्रकरण : आरोपी 48 तासात जेरबंद, मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू

By

Published : Dec 31, 2019, 9:29 AM IST

Updated : Dec 31, 2019, 10:49 AM IST

विरार पश्चिम येथील विराट नगरमध्ये शुक्रवारी (दि. 27 डिसें) संध्याकाळी मनिषा मनोहर डोंबळ (वय 63) या वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी भाईंदरमधून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपींसह पोलीस पथक
आरोपींसह पोलीस पथक

पालघर- विरार पश्चिम येथील विराट नगरमध्ये शुक्रवारी (दि. 27 डिसें) संध्याकाळी मनिषा मनोहर डोंबळ (वय 63) या वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी भाईंदरमधून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी

विरार पश्चिम येथील विराट नगर परिसरतील ग्रीषम पॅलेस सोसायटीमधील तळमजल्यावर राहणाऱ्या मनिषा डोंबळ या महिलेची चोरीच्या उद्देशाने हत्या झाली होती. जवळपास साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी यावेळी लांबवली होती. याबाबत मृत महिलेचे पती मनोहर डोंबळ यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना तसेच कोणताही पुरावा समोर नसताना प्राप्त माहितीच्या आधारे भाईंदर येथून दोन आरोपींना अवघ्या 48 तासात अटक केली आहे.

हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लाखोंचा गुटखा जप्‍त

यश इंदवटकर व विनयकुमार कानेटी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. तर या कटाचा मुख्य सुत्रधार विनोद पाडवी याचा शोध पोलीस घेत आहे. मुख्य आरोपी विनोद हा हत्या करण्यात आलेल्या मनिषा डोंबळ यांचा दूरचा नातेवाईक आहे. 24 डिसेंबर रोजी आरोपी विनोद व यश हे दोघे मनिषा डोंबळ यांच्या घरी गेले होते. त्यानंतर ते आणखी एकाला सोबत घेत 27 डिसें. रोजी संध्याकाळी पुन्हा घरी गेले होते. त्यानंतर तिघांनी मनिषा डोंबळ यांची हत्या केल्याची माहिती विरार उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी दिली.

हेही वाचा - पालघरमध्ये बनावट दारूची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टोळीचा पर्दाफाश

Intro:विरार हत्याप्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा..
अवघ्या 48 तासात आरोपी जेरबंद ...
मात्र कटाचा मुक्य सूत्रधार अद्याप फरारीBody:विरार हत्याप्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा..
अवघ्या 48 तासात आरोपी जेरबंद ...
मात्र कटाचा मुक्य सूत्रधार अद्याप फरारी

पालघर /विरार : विरार पश्चिम विराट नगर मध्ये शुक्रवारी संध्याकाळी 63 वर्षीय मनिषा मनोहर डोंबळ या वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत विरार पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना भाईंदर येथून अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.फरार आरोपीच्या शोधात पोलिस आहेत.विरार पश्चिम विराट नगर परिसरतील ग्रिषम पॅलेस या सोसायटीत तळमजल्यावर राहणाया मनिषा डोंबळया महिलेचा चोरीच्या उद्घेशाने हत्या झाली होती साधारण साडेसात लाख रूपयांचे दागीने व रोख रक्कम चोरट्यांनी या वेळी लांबवली होती.याबाबत मृत महिलेचे पती मनोहर डोंबळ यांनी विरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी याबाबत सिसिटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना तसेच कोणताही पुरावा समोर नसताने डम डेटाच्या आधारावर भाईदर येथून दोन आरोपींना अवघ्या 48 तासात अटक केली आहे.यश इंदवटकर व विनयकूमार कानेटी अशी या दोन आरोपींची नावे आहेत.तर या कटाचा मुख्य सूत्रधार विनोद पाडवी हा फरारी आहे.फरारी आरोपी विनोद हा हत्या करण्यात आलेल्या मनिषा डोंबळ यांचा दुरचा नातेवाईक लागतो.24 तारखेला आरोपी विनोद व यश हे दोघे मनिषा डोंबळ यांच्या घरी गेले होते.त्यानंतर
ते आणखीन एकाला सोबत घेत 27 तारखेला संध्याकाळी पुन्हा घरी गेले होते.त्यानंतर तीघांनी मनिषा डोंबळ यांची हत्या केल्याची माहिती विरार उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी दिली.

बाईट : रेणुका बागडे ,उपविभागीय पोलीस अधिकारीlConclusion:
Last Updated : Dec 31, 2019, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details