ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लाखोंचा गुटखा जप्‍त

author img

By

Published : Dec 28, 2019, 9:38 PM IST

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर तलासरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 12 लाख  15 हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.

गुटखा जप्‍त
गुटखा जप्‍त

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. तलासरीजवळच्या अच्छाड चेकपोस्ट येथे केलेल्या कारवाईत 12 लाख 15 हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.


महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असल्याने चोरट्या पद्धतीने जप्त केलेला गुटखा मुंबईला विक्रीसाठी नेला जात होता. अच्छाड चेकपोस्ट येथे वाहनांची नियमित तपासणी करताना पोलिसांना संशय आला. याप्रकरणी टेम्पोचा चालक शाहरूख शफिकउल्ला खान (वय 34, रा. वसई) याची चौकशी केली असता गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.

हेही वाचा - ठाण्यात मेडीकलमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

या प्रकरणी टेम्पोचा चालक शाहरूख शफिकउल्ला खान (वय 34, रा. वसई) , मालक रशिद अहमद सफिउल्ला (रा.वसई) आणि गुटखा विकत घेणार्‍या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तलासरी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

Intro:मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड चेकपोस्ट येथे तलासरी पोलिसांनी 12 लाख 15 हजार रुपये किमतीचा अवैद्य गुटखा केला जप्‍त
Body: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड चेकपोस्ट येथे तलासरी पोलिसांनी 12 लाख 15 हजार रुपये किमतीचा अवैद्य गुटखा केला जप्‍त


नमित पाटील,
पालघर, दि.28/12/2019


     मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी हद्दीतील अच्छाड चेकपोस्ट येथे पोलिसांनी  महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची चोरट्या पद्धतीने वाहतूक करणार्‍या एका टेम्पोवर कारवाई करत 12 लाख  15 हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी टेम्पोचा चालक, मालक व सदर माल विकत घेणार्‍या व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


     तलासरी पोलिसांचे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अच्छाड चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना एम.एच.50/0334 या क्रमांकाच्या टेम्पोच्या झडतीत त्यात विमल पानमसाला व व्ही-1 तंबाखुचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. यानंतर पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असुन याची किंमत  12 लाख 15 हजार रुपये इतकी आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना चोरट्या पद्धतीने सदर गुटखा मुंबईच्या दिशेने विक्रीसाठी नेला जात होता. दरम्यान, याप्रकरणी टेम्पोचा चालक शारुक शफिकउल्ला खान (वय 34, रा. वसई), टेम्पोचा मालक रशिद अहमद सफिउल्ला (रा.वसई) व सदर गुटखा विकत घेणार्‍या व्यापार्‍याविरुद्ध तलासरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम व नियमने 2011 कलम 26(2),27,23,26(2)(4), 30(2)(ओ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.