महाराष्ट्र

maharashtra

पालघर जिल्हा मुख्यालयाचे लोकार्पण

By

Published : Aug 20, 2021, 5:10 AM IST

palghar
palghar

पालघर जिल्हा मुख्यालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, पालघर मुख्यालयासाठी 307 कोटी 65 लाख रुपये खर्च आला आहे.

पालघर - पालघर जिल्हा मुख्यालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव सीताराम कुंटे व इतर मान्यवर ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्यात उपस्थित होते.

पालघर जिल्हा मुख्यालयाचे लोकार्पण

तर, पालघर मुख्यालय या ठिकाणी प्रत्यक्षात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार राजेंद्र गावित जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण, आमदार श्रीनिवास वनगा सुनील भुसारा, राजेश पाटील, विनोद निकोले, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, सिडकोचे उपाध्यक्ष संजय मुखर्जी, सिडको व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

अशी झाली मुख्यालयाची इमारत उभी

1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर नगरविकास विभागाने सिडकोला पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी प्रशस्त इमारत उभारण्यात यावी, असे आदेश दिले होते. सिडकोच्या यंत्रणेने त्यासाठी अद्यावत, असे नियोजन करून 5 इमारतींचे डिझाईन तयार केले. त्यामध्ये इमारतीच्या उत्कृष्ट वास्तुकलेचा वापर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीच्या कामास 21 ऑगस्ट 2017 रोजी सुरवात करण्यात आली होती.

पालघर मुख्यालयासाठी 307 कोटी 65 लाख खर्च

सिडकोला पालघर (कोळगाव) येथील दुग्धविकास विभागाची एकूण 440 हेक्टर जमीन देण्यात आली आहे. त्यापैकी 103 हेक्टर जमिनीवर सध्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हापरिषद या प्रमुख विभागाच्या इमारतीसह अन्य विभागासाठी एक प्रशासकीय इमारत असे पालघर जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले आहे. या इमारतींसाठी 307 कोटी 65 लाख रुपये खर्च आला आहे.

खर्चाचा तपशील :-

जिल्हाधिकारी इमारत -
बांधकाम क्षेत्रफळ. 15481 चौ.मी.
बांधकाम खर्च. 4343. लाख रुपये
अंतर्गत खर्च. 1701.49 लाख रुपये

जिल्हापरिषद इमारत -
बांधकाम क्षेत्रफळ. 15481 चौ.मी.
बांधकाम खर्च. 3959 लाख रुपये
अंतर्गत खर्च. 1737. लाख रुपये

पोलीस अधीक्षक इमारत -
बांधकाम खर्च. 2902.02 चौ.मी.
बांधकाम खर्च. 1395. लाख रुपये
अंतर्गत खर्च. 735.22 लाख रुपये

दोन प्रशासकीय इमारती -
बांधकाम क्षेत्रफळ. 31191 चौ.मी.
बांधकाम खर्च. 8234 लाख रुपये
अंतर्गत खर्च. 3345. लाख रुपये

हेही वाचा -नारायण राणेंनी अभिवादन केल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details