महाराष्ट्र

maharashtra

क्वारंटाइन सेंटरमध्येच तरुणाची आत्महत्या, जंगी पार्टी करून संपवलं जीवन

By

Published : Jul 10, 2020, 5:10 PM IST

क्वारंटाईन सेंटरमध्येच विष घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. हा तरुण तिरुपती बालाजी येथून गावी म्हणजे जिल्ह्यातील येडशी येथे आला होता.

Youth commits suicide in quarantine center in Osmanabad
क्वारंटाईन सेंटरमध्येच तरुणाची आत्महत्या

उस्मानाबाद - क्वारंटाईन सेंटरमध्येच विष घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. हा तरुण तिरुपती बालाजी येथून गावी म्हणजे जिल्ह्यातील येडशी येथे आला होता. उमेश ओहळ असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. घटनेनंतर तरुणाला उपचारासाठी उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

विष प्राशन करण्‍यापूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये त्याने जंगी पार्टी केल्याचे बोलले जात आहे. येडशी येथील सरपंचासह सहाजण आणि बार्शी तालुक्यातील तीन असे नऊ जण एकाच गाडीमध्ये बसून २ जुलैला तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. सदरील ९ जणांनी प्रशासनाची दिशाभूल करुन ऑनलाइन पास काढून घेतले असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हे सर्वजण तिरुपती येथून दर्शन करून सोमवारी आपल्या गावी परत दाखल झाले. गावामध्ये आल्यानंतर येडशी ग्रामस्थांनी या सहा जणांना क्वारंटाईन होण्याची विनंती केली. मात्र, सरपंचासह इतर पाच जणांनी त्यास नकार दिला. त्यानंतर ग्रामस्थ एकत्र जमल्याने आणि अधिकाऱ्यांच्या कानावर ही माहिती गेल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असतानाही त्यांनी कक्षात जंगी पार्टी केली. त्याच रात्री यातील उमेश ओहळ याने विष घेऊन आत्महत्या केली. अद्याप आत्महत्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, क्वारंटाईन कक्षात जंगी पार्टी करण्याचे साहित्य आणि आत्महत्या करण्यासाठी विष कोठून आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणाची चौकशी होऊन संबंधित दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details