महाराष्ट्र

maharashtra

तुळजापूर मंकावती तीर्थकुंड प्रकरण - जिल्हाधिकारी आदेशाला नगर विकास मंत्र्यांकडून स्थगिती

By

Published : Aug 5, 2021, 10:08 AM IST

Updated : Aug 5, 2021, 11:39 AM IST

तीर्थकुंड प्रकरण

तुळजापूर येथील भाजप नेते देवानंद साहेबराव रोचकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या विरोधात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील केली होती. नगरविकास मंत्री यांच्याकडे अपील करताना रोचकरी यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता निकाल दिल्याचे म्हटले होते.

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला मंकावती तीर्थकुंडावरील अतिक्रमण प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी मंदिर परिसरातील मंकावती तीर्थकुंडावर अतिक्रमण करून बांधकाम केले होते. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर एक समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 30 जुलै रोजी दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.

तुळजापूर मंकावती तीर्थकुंड प्रकरण

भाजपचे देवानंद रोचकरींची मंत्र्याकडे धाव
तुळजापूर येथील भाजप नेते देवानंद साहेबराव रोचकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या विरोधात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील केली होती. नगरविकास मंत्र्यांकडे अपील करताना रोचकरी यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता निकाल दिल्याचे म्हटले होते. त्यावरून ही स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीनंतर रोचकरी समर्थकांनी सोशल मीडियावर ' बाप म्हणतात तुळजापूरचा ' असे पोस्ट करीत आनंदोत्सव साजरा केला. या प्रकरणी आता नगर विकास मंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला आहे.

रोचकारी यांची मागणी

या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी, अशी मागणी रोचकरी यांनी केली आहे. मंकावती कुंडावर अनेक ठिकाणी विनापरवाना अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसते. या प्रकरणी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.

ईटीव्हीचा ग्राऊंड रिपोर्ट

मनसेच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

गरीबनाथ दशअवतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.


जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून दिला होता आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे,नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती. या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. मंकावती तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी केली होती.

मनसेची मागणी

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपविले होते. त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे. मंकावती कुंडाच्या बनावट कागदपत्रे व पुरावे तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे आदेश होते. मात्र याला मंत्र्यांनी स्थगिती दिली त्यामुळे आता या प्रकरणाकडे देविभक्तांचे लक्ष लागले आहे

स्टे ऑर्डर

'बाप म्हणतात तुळजापूरचा'

तालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे. तेवढे सांगा म्हणजे 7/12 रिकामा करुन घेतो आम्ही, अशा आशयाचे संदेश असलेल्या पोस्ट देवानंद रोचकरी यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर टाकले. भाजपच्या नेत्यांच्या विरोधात असलेल्या आदेशाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी लागलीच स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या माजी मंत्र्यांच्या सहकार्याने स्थगिती आदेश आणला असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे. याप्रकरणी भाजप नेते देवानंद साहेबराव रोचकरी यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा आमच्या प्रतिनिधीने प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

Last Updated :Aug 5, 2021, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details