महाराष्ट्र

maharashtra

शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

By

Published : Sep 19, 2021, 10:34 AM IST

अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून सर्वत्र सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जन मिरवणूकीस परवानगी नाकारल्याने शांततेत व समुहात गणपती विसर्जन होणार नाही. सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात राहणार आहे.

नाशिक- गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून सर्वत्र सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जन मिरवणूकीस परवानगी नाकारल्याने शांततेत व समुहात गणपती विसर्जन होणार नाही. सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात राहणार आहे.

अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

मिरवणूकांना बंदी, जमावबंदी आदेश लागू...

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहेत. दहा दिवसांपासून मनोभावे गणपतींची आराधना होत असून आज त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्रदुषण टाळण्यासाठी विसर्जन ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून कृत्रिम तलावांसह मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.त्यानुसार ३ पोलिस उपआयुक्त, ६ सहायक आयुक्त,२७ पोलिस निरीक्षक,९३ सहायक व उपनिरीक्षक, २ हजार पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, ४५० गृहरक्षक दलाचे जवान, दंगा नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यावर्षी मिरवणूकांना बंदी असल्याने तसेच जमावबंदी आदेश लागू असल्याने नागरिकांना शांततेत व गर्दी न करता विसर्जन करावे लागणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी चोरटे सक्रीय राहण्याची शक्यता गृहीत धरून साध्या वेषातील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details