महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut On Shinde Govt : सर्वोच्च न्यायालयाने 'त्यांना' नागडे केले; शिंदे सरकारवर संजय राऊत यांचा घणाघात

By

Published : May 12, 2023, 3:54 PM IST

Sanjay Raut On Shinde Govt
संजय राऊत यांचा घणाघात

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे नेते पेढे वाटत आहे. खासदार हेमंत गोडसे नाचत होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नागडे केले. अंतर्वस्रसुद्धा ठेवले नाही. बेकायदेशीर लोकांनी मत केले आणि ते बेकायदेशीर असलेला आमचा व्हिप खरा असे सांगत आहेत. मग हे पेढे का वाटत आहे? अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारविषयी संजय राऊतांची प्रतिक्रिया

नाशिक: शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात जाणार. मरण अटळ आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका, तुम्ही अडचणीत याल असे खासदार संजय राऊत यांनी पोलिसांना आव्हान केले. पोपटाला काहीही म्हणू द्या; पण सरकार जाणार 16 आमदार घरी जातील असेही राऊत यांनी म्हटले. संजय राऊत आज (शुक्रवारी) नाशिक दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.


तर 'कंटेंट ऑफ कोर्ट':देवेंद्र फडणवीस यांनी वकील म्हणून पुन्हा एकदा कायद्याची पुस्तके चाळली पाहिजे. मूळ पक्ष याबद्दल स्पष्ट मत सांगितले आहे. उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख असतील. 16 आमदारांचा विषय होता. आता सरकारच अपात्र ठरवले. यावर 'कंटेंट ऑफ कोर्ट' होऊ शकतो. विरोधकांचे चेहरे सांगत आहेत की ते आतून रडत आहे. फक्त तीन महिने मरण पुढे ढकलले. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर असताना त्यांचा राजकीय इतिहास तपासून त्यांनी अनेक पक्ष बदलले. आचार, विचार नाही आणि ते त्या पदावर असताना बोलता येत नाही. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालावरून निर्णय घ्यावा लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले.


कायद्याच्या चौकटीत राहून निकाल:कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांच्या राजीनाम्यावर बोलणार नाही,अध्यक्षांना 90 दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा महाराष्ट्र बघेल. उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचाही दबाव नव्हता. त्यांनी स्वखुशीने राजीनाम्याचा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीस पत्रकार परिषद घेऊन हसत हसत सांगत आहे, निर्लज्जपणा करत लोकांना फसवत आहेत. संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाने निकाल दिला आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले.


बेकायदा आदेश पाळू नये:शिंदे-फडणवीस सरकारला कायदा कळत नसेल तर आम्ही कायदा सांगतो. 2014 पासून नैतिकता आणि संस्कार हे भाजपने संपविले. आता काय नैतिकतेचा मुद्दा घेऊन बसलात? 2019ला आम्ही काय केले यावर बोलण्याचा अधिकार नाही. देशात अराजकता माजेल. पोलिसांनी आणि प्रशासनाने बेकायदा आदेश पाळू नये, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

  1. Shot To Youth : हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने झाडली तरुणावर गोळी; तरुणाचा मृत्यू
  2. Sharad Pawar for MVA stronger : महाविकास आघाडी मजबुतीची शरद पवारांची हाक, अजित पवारांच्या उपद्रवमूल्यावर प्रश्नचिन्ह
  3. Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळाला-अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details