महाराष्ट्र

maharashtra

एक गाव एक गणपती संकल्पना राबवा - अप्पर पोलीस अधिक्षक

By

Published : Aug 19, 2020, 4:49 PM IST

दिंडोरी परिसरातील गणेश उत्सव मंडळ व शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले.

Asp
उपस्थित नागरिक

दिंडोरी ( नाशिक ) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून एक आदर्श निर्माण करावा, असे आव्हान नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले. दिंडोरी परिसरातील गणेश उत्सव मंडळ व शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी काटेकोरपणे पालन करावे व यावर्षीचा गणेशोत्सव सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून सर्व गणेशोत्सवाच्या मंडळांनी एकाच वेळेस नियमित आरती करून एक चांगला आदर्श आपण निर्माण करावा व विसर्जन करताना कुठल्या प्रकारची मिरवणूक न काढता आपल्या घरीच विसर्जन करावे.

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, तहसीलदार कैलास पवार, नगराध्यक्ष कैलास मावळ, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश येवले, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनी केले. त्यांनी सर्व गणेश मंडळांना शासनाच्या नियमांचे पालन करून आपण गणेशाची स्थापना करावी, असे आवाहन केले. तसेच तहसीलदार कैलास पवार नगराध्यक्ष कैलास मावळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, नगरसेवक माधवराव साळुंखे ,फारुख बाबा ,यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी शांतता कमिटीचे मनोज ढिकले , माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, काका देशमुख, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील मुळाणे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details