महाराष्ट्र

maharashtra

Satyajeet Tambe : मी अपक्षच राहून कार्य करणार; सत्यजित तांबेंचे स्पष्टीकरण

By

Published : Feb 4, 2023, 4:52 PM IST

Updated : Feb 4, 2023, 6:12 PM IST

मी अपक्षच राहून कार्य करणार असे स्पष्टीकरण सत्यजित तांबे यांनी आज दिले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची सर्वाधिक चर्चा आहे.

Etv Bharat
Etv Bharat

नाशिक - मी अपक्षच राहून कार्य करणार असे स्पष्टीकरण सत्यजित तांबे यांनी आज दिले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणूक निकालांवर नजर टाकल्यास तीन जागा महाविकास आघाडीने, एक जागा भाजपने आणि एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे.

सत्यजित तांबेची चर्चा : सत्यजित तांबे हे काँग्रेसचे माजी नेते आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत. नाशिक विभागाच्या पदवीधर जागेसाठी काँग्रेसने यापूर्वी सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते, मात्र सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. यानंतर सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या समर्थक उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29 हजार 465 मतांनी पराभव केला. शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली होती. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.

मतदारांचे मानले आभार :आपल्या विजयाबद्दल सत्यजित तांबे यांनी नाशिक विभागातील मतदारांचे आभार मानले आहेत. तांबे यांनी ट्विट केले की, 'मी उत्तर महाराष्ट्रातील सर्व नागरिक, नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदार, प्रत्येक संघटना, सर्व राजकीय व सामाजिक नेते, कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी मला या निवडणुकीत पाठिंबा दिला. मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही.

दणदणीत विजय मिळवला :तांबे यांना कोणत्याही पक्षाचा अधिकृत पाठिंबा नसतानाही दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची खूप चर्चा होत आहे. सत्यजित तांबे यांचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी सुरुवातीपासूनच जोडले आहे. तांबे यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचे तर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. आता सत्यजित तांबे अपक्ष म्हणुनच जनतेची सेवा करणार आहे.

हेही वाचा -Mumbai Terror Attack Threat : मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची पोलिसांना ट्विटरवरून धमकी

Last Updated :Feb 4, 2023, 6:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details