महाराष्ट्र

maharashtra

Corona Restrictions Free Nashik: नाशिक शहर लवकरच कोरोना निर्बंध मुक्त होणार; ग्रामीण भागात निर्बंध कायम

By

Published : Mar 18, 2022, 5:44 PM IST

Updated : Mar 18, 2022, 5:56 PM IST

नाशिकमध्ये रंगपंचमी आणि रहाडीला परवानगी मिळणार असल्याचे ( permission for Holi in Nashik ) पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात धुलीवंदनानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी खेळण्यात येते. रहाडीला रंगपंचमीची परवानगी मिळावी, अशी मागणी आहे. सोमवारी अधिकारी बैठक घेऊन रहाडीला परवानगी ( Permission for Rahadi in Nashik ) देण्यात येणार आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ

नाशिक - मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरही कोरोना निर्बंध मुक्त ( Corona Restrictions Free Nashik ) होणार आहे. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचे निर्बंध कायम असतील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ ( Chagan Bhujbal on corona restrictions ) यांनी केली आहे. पालकमंत्री आढावा बैठकीनंतर बोलत होते.


नाशिकमध्ये रंगपंचमी आणि रहाडीला परवानगी मिळणार
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. येत्या दोन दिवसात नाशिक शहरासाठी नवी नियमावली जाहीर करणार आहे. नाशिकमध्ये रंगपंचमी आणि रहाडीला परवानगी मिळणार असल्याचे ( permission for Holi in Nashik ) पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात धुलीवंदनानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी खेळण्यात येते. रहाडीला रंगपंचमीची परवानगी मिळावी, अशी मागणी आहे. सोमवारी अधिकारी बैठक घेऊन रहाडीला परवानगी ( Permission for Rahadi in Nashik ) देण्यात येणार आहे.

शहर लवकरच कोरोना निर्बंध मुक्त होणार

हेही वाचा-Kandivali Bus Fire : कांदिवलीत व्होल्वो बसला लागली अचानक आग; कोणतीही जीवितहानी नाही

जिल्ह्यातील निर्बंध हटविण्याबाबत सोमवारी निर्णय घेणार

नाशिक शहराने कोरोनाने निर्बंध काढण्यासाठीचे निकष पूर्ण केले आहेत. १०० टक्के निर्बंध हटवायला हरकत नाही, असे प्रधान सचिव यांनी सांगितले आहे. मात्र, एक ते दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, धोका टळला नसून सर्वानी मास्क लावण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना गेला असे समजू नका. चीनमध्ये तीन कोटी रुग्ण झाले आहेत. तेथे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध हटविण्याबाबत सोमवारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा-Kandivali Bus Fire : कांदिवलीत व्होल्वो बसला लागली अचानक आग; कोणतीही जीवितहानी नाही

जिल्ह्यात फक्त ७४ कोरोना रुग्ण
जिल्ह्यात फक्त ७४ कोरोना रुग्ण आहेत. कोव्हिड रिलीफ फंडसाठी १५ हजार २३३ प्रस्ताव आले आहे. त्यापैकी ९६६४ प्रस्ताव मंजूर झाले आहे. तर ४४८६ प्रस्तावांची तपासणी सुरू आहे. १०८३ प्रस्ताव नामंजूर केले आहेत. लसीकरणावर भर देताना ते म्हणाले की, लसीकरण पहिला डोस ८४ टक्के झाला आहे. दुसरा डोस ६२ टक्के झाला आहे. नाशिक मनपात पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त आहे. तर दुसरा डोस ७२ टक्केपेक्षा जास्त घेतला आहे.

हेही वाचा-Pune Crime News : पुण्यात मुलाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू, मुलीच्या आईसह चौघांना वारजे पोलीसांनी केली अटक

Last Updated :Mar 18, 2022, 5:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details