महाराष्ट्र

maharashtra

MNS Workers Vandalize Toll Plaza: अनधिकृत टोलनाक्याविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेकडून पुन्हा राडा, अमित ठाकरेंच्या दौऱ्यात काय घडले?

By

Published : Jul 23, 2023, 1:34 PM IST

Updated : Jul 23, 2023, 1:56 PM IST

अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गाचा टोल नाका फोडल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. टोलनाका बंद करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनसेने पुन्हा एकदा टोल नाका फोडला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रचंड राडा केला.

MNS Workers Vandalise Toll Plaza
मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला

मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला

नाशिक :मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबार नंतर शनिवारी त्यांनी अहमदनगरमधे कार्यकर्त्यांची भेट घेतली. उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली होती. रात्री अडीच वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा टोल नाका मनसे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांसह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फोडला.


'म्हणून' फोडला टोल नाका :मनसे नेते अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अर्धा तास थांबवल्यानंतर संतप्त झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या तोडफोडीत संपूर्ण समृद्धी टोल नाक्याचे नुकसान झाले. 22 जुलै रोजी सायंकाळी अमित ठाकरे अहमदनगरहून सिन्नरच्या दिशेने जात होते. समृद्धी महामार्गच्या सिन्नर टोल प्लाझा येथे अमित ठाकरे यांचा ताफा सुमारे अर्धा तास थांबला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड केली.



राज ठाकरेंनी केले होते आंदोलन :काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील टोल नाक्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले होते. प्रदीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टोलनाके फोडण्याचे प्रकार घडले होते. तसेच त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील तब्बल सत्तरहून अधिक टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले होते. मनसे कार्यकर्ते त्यांच्या आक्रमकतेमुळे नेहमीच चर्चेत राहतात.

किणी टोल नाक्यावर आंदोलन :महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यावर 26 जुलै आंदोलन करण्यात आले होते. अंगावर काळे कपडे परिधान करून, डोळ्याला काळी पट्टी बांधून आणि न्याय देवतेचा तराजू हातात घेऊन हे आंदोलन केले गेले होते. मुदत संपूनही टोल नका सुरू असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले होते. टोल धाड बंद झाली पाहिजे, अशी मागणी आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी केली होती.

हेही वाचा :

  1. MNS Protest Against Hawkers : फेरीवालामुक्त परिसराची डेडलाईन संपली; मनसे स्टाईलने आंदोलनाला सुरुवात
  2. MNS Kini Toll Agitation : मुदत संपली तरीही टोल सुरूच; मनसेचे किणी नाक्यावर आंदोलन
  3. Jamda Dam Project : जामदा धरण प्रकल्पावरुन ग्रामस्थ आणि मनसे आक्रमक; काम पाडले बंद
Last Updated : Jul 23, 2023, 1:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details