ETV Bharat / state

MNS Kini Toll Agitation : मुदत संपली तरीही टोल सुरूच; मनसेचे किणी नाक्यावर आंदोलन

author img

By

Published : Jul 26, 2022, 7:26 PM IST

Updated : Jul 26, 2022, 7:49 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ( Pune Bangalore National Highway ) किणी टोल नाक्यावर ( Kini Toll Agitation MNS ) आंदोलन करण्यात आले. अंगावर काळे कपडे परिधान करून, डोळ्याला काळी पट्टी बांधून आणि न्याय देवतेचा तराजू हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन किणी
मनसे आंदोलन किणी

कोल्हापूर - मुदत संपूनही टोल नका सुरू असल्याच्या निषेधार्थ आज ( मंगळवारी ) महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ( Pune Bangalore National Highway ) किणी टोल नाक्यावर ( Kini Toll Agitation MNS ) आंदोलन करण्यात आले. अंगावर काळे कपडे परिधान करून, डोळ्याला काळी पट्टी बांधून आणि न्याय देवतेचा तराजू हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले. शिवाय आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी टोल धाड बंद झाली पाहिजे, अशीही मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

आंदोलन करताना मनसे कार्यकर्ते



'मुदत संपली तरीही टोल' : 2 मे 2022 रोजी राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोल नाक्याची मुदत संपली आहे. मात्र तरीही कोरोना, महापूर आणि नोटबंदीची कारणे सांगून टोलची मुदत पुन्हा दीड महिन्यांनी वाढवून घेण्यात आली होती. आजपर्यंत लाखो वाहनधारकांच्याकडून टोल वसुली सुरू आहे. येथील किनी, तासवडे टोल नाक्यावर जमाखर्चाचा इलेक्ट्रॉनिक बोर्ड व अन्य नियम शासनाने बंधनकारक केले असताना अनेक वर्षांपासून जमाखर्चाचे चित्र कधी पाहायला मिळाले नाही. सध्या या टोलसाठी सहा पदरीकरणाचे कारण सांगण्यात येत आहे. पण सहा पदरी मार्ग झालाच नाही तरी टोल कशासाठी ? असा सवाल करत महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष घालून वाहनधारकांची होणारी लूट तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Jayant Patil : 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीने राज्याला अपंग केलयं'

Last Updated : Jul 26, 2022, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.