महाराष्ट्र

maharashtra

मूलभूत सुविधासाठी उभा दगड व धानोरा गावातील नागरिकांचा संघर्ष सुरूच

By

Published : Aug 30, 2020, 6:22 PM IST

Updated : Aug 30, 2020, 6:53 PM IST

शहादा तालुक्यातील उभा दगड आणि धानोरा बुद्रुक या गावात स्वातंत्र्यापासून विकास झालेला नाही. ही दोनही गाव वनक्षेत्रात येतात. यामुळे त्यांना अजूनही महसूली दर्जा प्राप्त झालेला नाही. या कारणाने या गावात आतापर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात येऊ शकलेली नाही.

villagers of ubha dagad and dhanora are still fighting for basic amenities
मूलभूत सुविधासाठी उभा दगड व धानोरा गावातील नागरिकांचा संघर्ष सुरूच..

नंदुरबार - शहादा तालुक्यातील उभा दगड आणि धोनोरा बुद्रुक ही दोन गाव स्वातंत्र्यापासून आजघडीपर्यंत विकासापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, उभा दगड या गावातून आचार्य विनोबा भावे यांनी जंगल सत्यागृहाचा शुभारंभ केला होता. इतिहासाच्या पानात नोंद असलेले हे गावच विकासापासून कोसो दूर आहे. राजकीय नेते फक्त निवडणूकीत आश्वासन देतात पण यावर काहीच करत नाहीत, अशी ओरड ग्रामस्थांची आहे.

शहादा तालुक्यात उभा दगड आणि धानोरा बुद्रुक ही दोन गाव येतात. या गावात स्वातंत्र्यापासून विकास झालेला नाही. ही दोनही गाव वनक्षेत्रात येतात. यामुळे त्यांना अजूनही महसूली दर्जा प्राप्त झालेला नाही. या कारणाने या गावात आतापर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात येऊ शकलेली नाही.

साडेसातशे लोकवस्ती असलेल्या उभा दगड गावात जाण्यासाठी अद्याप चांगला रस्ता नाही. तसेच नदीवर पूलदेखील नाही. यामुळे पावसाळ्यात त्या गावात राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर वीज, पाणी आणि आरोग्य केंद्र यासारख्या सुविधापासून येथील नागरिक वंचित आहेत.

ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधलं. शासकीय कार्यालयाला भेटी देऊन चपलांच्या टाचा झिजवल्या, पण अद्याप स्थिती जैसे थे, अशीच आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावाला भेट देऊन या गावांचा विकास करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशालाही अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली.

निवडणुका आल्या की राजकीय नेते आश्वासने देतात, काही घटना घडली की गावांना भेटी देतात. त्याठिकाणी गावाच्या विकासाची आश्वासने दिली जातात. मात्र या दोघी गावातील नागरिक गेल्या 74 वर्षापासून शासन दरबारी लढा देत असले तरी सरकारी लाल फितीचा कारभार त्यांना न्याय देत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उभा दगड गावातील महिलेची प्रतिक्रिया...
हेही वाचा -कोरोनामुळे ढोल-ताशा कारागीर आर्थिक संकटात; लाखोंची उलाढाल ठप्प

हेही वाचा -नंदुरबार : सुसरी प्रकल्पातून गोमाई नदीपात्रात पाण्याचा विसर्ग; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Last Updated : Aug 30, 2020, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details