महाराष्ट्र

maharashtra

ST Worker Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने समन्वयाची भूमिका घ्यावी - प्रवीण दरेकर

By

Published : Nov 28, 2021, 8:58 AM IST

राज्य सरकारने विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी समन्वय साधून बैठक लावावी व यातून मार्ग काढावा. राज्य सरकारने शांततेत चाललेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ( ST Worker Agitation ) दडपशाहीने उलथवण्याचा प्रयत्न करू नये असे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर ( Praveen Darekar on tour of Nandurbar ) यांनी हे म्हटले.

ST Worker Strike
प्रवीण दरेकर

नंदुरबार - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर ( Praveen Darekar on tour of Nandurbar ) आले होते. त्यांनी जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनास ( ST Worker Agitation ) भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. राज्य सरकारने विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी समन्वय साधून बैठक लावावी व यातून मार्ग काढावा. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे शांततेत चाललेले आंदोलनास दडपशाही पणा करू नये असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. ( Praveen Darekar on ST Worker Strike )

प्रवीण दरेकर प्रतिक्रिया देताना

राज्य सरकारवर टीका -

राज्यात एसटीची होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासण्याची गरज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा बस स्थानकातील ( Shahada bus stand ) आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सरकारची पगारवाढ आभासी असून कर्मचाऱ्यांनी किती लाभ होतो याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

शरद पवारांनी आपला शब्द पाळावा -

शासनाने दडपशाहीने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये शरद पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, आम्ही सरकारचे अभिनंदन करु असे यावेळी दरेकरांनी म्हटले आहेत. मी कर्मचाऱ्यांच्या बाजुने चर्चेस तयार, विलीनकरण कसे होईल याचा शासनाला मार्ग दाखवतो. शासनाने पत्रकार परिषदमध्ये काय बोलले हा निर्णय नाही. पगारवाढीसह ज्या घोषणा केल्या त्याचा अद्यापही लेखी शासन निर्णय नाही. कोर्टाने विलनीकरण करु नका असे सांगितलेले नाही. समितीचे सारे सदस्य सरकारचेच त्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा. समिती निर्णय घेईल असे सांगत महाराष्ट्रातील प्रवासी सहनशील असून एसटी कर्मचाऱ्यांसाठी ते त्रास सहन करुन त्यांना पाठबळ देत असल्याचे देखील दरेकरांनी सांगितले आहे.

हेही वाचा -१८ हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू.. ३,२१५ कर्मचारी निलंबित तर १,२२६ कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details