१८ हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू.. ३,२१५ कर्मचारी निलंबित तर १,२२६ कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

author img

By

Published : Nov 27, 2021, 8:54 PM IST

st worker strike

कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्यानंतर शनिवारी १८ हजाराहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर आजपर्यंत ६२७७ कायम कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि १४९६ रोजंदारी कामगारांच्या सेवा समाप्तीची कारवाई केल्याची माहिती एसटी महामंडळ परिवहन विभागाने दिली आहे.

मुंबई - कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्यानंतर शनिवारी १८ हजाराहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर आजपर्यंत ६२७७ कायम कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि १४९६ रोजंदारी कामगारांच्या सेवा समाप्तीची कारवाई केल्याची माहिती एसटी महामंडळ परिवहन विभागाने दिली आहे.

कारवाईचा बडगा -

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, या मागणीसाठी मागील ३१ दिवसांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या बुधवारी कर्मचाऱ्याची पगारवाढीची घोषणा राज्य सरकारने करून कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. कर्मचाऱ्यांच्या कृती समितीची बैठक शुक्रवारी परिवहन मंत्र्यांसोबत पार पडली. या बैठकीत समितीने पगारवाढीमध्ये तफावत असल्याने फेरविचार करावा तसेच सातवा वेतन आयोग व इतर प्रलंबित मागण्यांकडेही कृती समितीने लक्ष वेधले. त्यावर फेरविचार केला जाईल, मात्र आधी कामावर रुजू व्हा, असे आवाहन करीत शनिवारपर्यंत कामगारांना अल्टिमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही कामावर रुजू न झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्र्यांना दिला होता.

आज ५२५ एसटी धावल्या -

कामगारांच्या संपाचे नेतृत्व करण्यास कोणतीही संघटना पुढे येत नसल्याने कामगारांमध्ये अस्थिरता निर्माण होऊन फूट पडल्याची स्थिती आहे. कारवाईच्या भितीने शनिवारी १८ हजारहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र अजूनही काही कर्मचारी संपावर ठाम राहिल्याने आज ३०१० तर आतपर्यंत ६२७७ कायम कर्मचाऱ्यांना निलंबित केले. २७० तर आजपर्यंत १४९६ रोजंदारी कामगारांच्या सेवा समाप्ती केल्या आहेत. सेवा समाप्तीची नोटीस बजावलेल्या पैकी २४० कामगार आज कामावर हजर झाले. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इतर आगारासह कोल्हापूर आणि सांगली विभागांमध्ये बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. महामंडळाने दुपारी दोन वाजेपर्यंत विविध मार्गांवर ३१३ सामान्य बसेससह ४१० बससेवा चालवल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महामंडळाच्या जवळपास ५२५ बसेस चालवल्या होत्या. रविवारपर्यंत बहुतांशी एसटी डेपो सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.