महाराष्ट्र

maharashtra

नवापूर तालुक्यात संचारबंदी; नियमांचे पालन करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

By

Published : Mar 17, 2021, 9:45 PM IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाभरात सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नवापूर तालुक्यात संचारबंदीचे पालन केले जात असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

नंदुरबार
नंदुरबार

नंदुरबार- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाभरात सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नवापूर तालुक्यात संचारबंदीचे पालन केले जात असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

नंदुरबार

नवापूर तालुक्यात आतापर्यंत 6 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यातून 860 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 786 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. तर सध्या 125 रुग्णांवर उपचार सुरू असून तालुक्यातून 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात लावण्यात आलेल्या सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या कडक संचारबंदीचे तंतोतंत पालन केले जात आहे. सायंकाळी सहा वाजेनंतर नागरिक आपले व्यवसाय, दुकाने व प्रतिष्ठाने बंद करण्यास सुरुवात करतात व सायंकाळी सात वाजेपर्यंत शहर पूर्णतः बंद होत आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

परराज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी

गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येते. त्याच बरोबर तपासणी नाक्यावर येणाऱ्या नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येते. थर्मल स्कॅनिंग दरम्यान तापमानात वाढ दिसल्यास प्रवाशांची आरटी-पीसीआर तपासणी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवापूर शहर व तालुक्यात लावण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान नागरिकांनी सायंकाळी 7 वाजेनंतर घराबाहेर निघू नये, त्याचबरोबर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. लग्न समारंभ अथवा सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू नये, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details