महाराष्ट्र

maharashtra

Anganwadi Worker Suicide: अंगणवाडी सेविका आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर चुकीचा आरोप, महिला कर्मचाऱ्यांचा दावा

By

Published : Feb 17, 2023, 1:07 PM IST

धडगाव तालुक्यातील तेलखेटी येथील अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूप्रकरणी महिला व बालविकास विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी कैफियत मांडली आहे. अंगणवाडी सेविका आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर झालेला आरोप हा चुकीचा आहे. त्यांच्यावर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे याबाबत त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महिला कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Anganwadi worker death
नंदुरबार अंगणवाडी सेविका आत्महत्या प्रकरण

अंगणवाडी सेविका आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर चुकीचा आरोप

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील अंगणवाडी सेविका अलका वळवी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महिला बालकल्याण विभागातील तोरणमाळ विभागाचे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह इतर पाच जणांवर आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता धडगाव येथील महिला बालकल्याण विभागाच्या सुपरवायझर आणि काही कर्मचाऱ्यांनी शहादा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. याप्रकरणात प्रकल्प अधिकाऱ्यांना गोवण्यात येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास करण्यात यावा. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची होणारी बदनामी थांबवावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.



अंगणवाडी सेविकेचा अपघातानेच मृत्यू:अंगणवाडी सेविका पतीसोबत दुचाकीनी येत असताना तिच्या अपघाताने मृत्यू झाला आहे. तरी अधिकाऱ्यांवर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. म्हणून हे गुन्हे मागे घेण्यात यावे व सदर अंगणवाडी सेविकेची मृत्यू बाबत अपघाताची नोंद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. अंगणवाडी सेविका अलका वळवी यांच्या मृत्यूनंतर जवळपास दहा दिवस झाले आहेत. अद्यापही त्यांचा मृतदेह मिठाचा पुरून आहे. धडगाव तालुक्यातीलच खडक्या येथील महिलेचा मृतदेह सुमारे 50 दिवस मिठात पुरून होता. तिच्या मृतदेह बाहेर काढून त्याची नवीन शविच्छेदना करण्यात आले होते. त्या प्रकरणाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण: नंदुरबार जिल्ह्यातून दुःखद घटना घडली होती. धडगाव तालुक्यातील अलका वळवी या अंगणवाडी सेविकेने एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील अधिकाराच्या शारीरिक सुखाच्या मागणीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या अंगनवाडी सेविकेचे मागील 3 वर्षांपासून वेतन थकित होते. तिने वेतनसाठी विचारणा केली असता आयसीडीएस अधिकाऱ्यांकडून तिला त्रास दिला जात होता. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. असा आरोप अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता.

शारिरीक सुखाची मागणी : कोरोना महामारीनंतर अनेक अंगणवाडी सेविका या आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. कोरोनाच्या काळामध्ये जे कोविडयुद्धे काम करत होते. त्यामध्ये अंगणवाडी सेविका देखील महत्त्वाच्या भूमिका निभावत होत्या. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका अलका वळवी यांना गेल्या तीन वर्षापासून महिला बालविकास विभागाकडून पगार दिला गेला नव्हता. तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी देखील केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने तालुका शहादा गाव म्हसावद येथील जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे.

हेही वाचा: Anganwadi Worker Suicide धक्कादायक अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details