महाराष्ट्र

maharashtra

Navratri 2022 : नवरात्र काळात भाविकांची रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी रिघ, देवीची अख्यायिका घ्या जाणून

By

Published : Oct 1, 2022, 12:42 PM IST

navratra mohotsav 2022

लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील गडावर यादवांच्या कालखंडात श्री रत्नेश्वरी देवी मातेच्या मंदिराची उभारणी झाली ( Ratneshwari Devi temple establishment story ) आहे. हेमाडपंथी बांधकाम, अनेक अख्यायिकांचे दिले जाणारे दाखले आणि भाविकांची श्रद्धा यामुळे रत्नेश्वरी देवी मंदिराचे वेगळेपण अधोरेखित होते.

नांदेड -नांदेड-लातूर या राष्ट्रीय महमार्गावर जानापुरीपासून पूर्वेला ३ कि.मी. अंतरावर वडेपुरी शिवारात उंच टेकडीवर या रत्नेश्वरी देवीचे मंदिर ( Ratneshwari Devi Temple ) आहे. देवगिरीच्या यादवांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत या भागात किल्ला बांधण्यापूर्वीच्या कामासाठी या भागात आले होते. ते एका ठिकाणी शिळेवर बसले तेवढ्यात त्यांना रत्नेश्वरी देवीने दृष्टांत दिला. त्यानंतर या ठिकाणी मंदिर निर्माण करण्यात आले. अशी अख्यायिका रत्नेश्वरी देवीच्या मंदिर स्थापनेची कथा ( Ratneshwari Devi temple establishment story ) सांगितली जाते.

श्री रत्नेश्वरी देवी

रत्नेश्वरी गड म्हणून ओळख -मंदिराच्या उभारणीनंतर या भागाला रत्नेश्वरी गड या नावाने ओळखले जाऊ लागले. दरवर्षी नवरात्रोत्सव ( Navratri 2022) काळात या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या काळात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. रत्नेश्वरी देवी हे जाज्वल्य देवस्थान असून, अनेक भाविकांना त्याची, अनुभूत आल्याने दूर दूरहून भाविक येथे दर्शनासाठी येतात. निसर्गरम्य परिसर, भाविकांचा वाढलेला ओढा, या बाबी लक्षात घेता, शासनाने या धार्मिक स्थळाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करुन या स्थळाचा विकास करावा, अशी येथील मागणी आहे. या वर्षी नवरात्र उत्सव काळात धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.

देवीची अख्यायिका -नारायण माळी आणि लक्ष्मीबाई यांची रत्नाही तेजस्वी कन्या. लहानपणापासून तिने अनेकांचे कल्याण केले. यादवांचा किल्ला बांधणाऱ्या कारागिरांकडून रत्नाने महादेवाची पिंड तयार करुन घेतली श्रावण महिन्यात दररोज पूजेसाठी येथे येण्याचा संकल्प तिने केला. यादवांचा सरदार शंभुनाथ माळी यांच्यासोबत रत्नाचा विवाह झाला. विवाहानंतर भल्या पहाटे रत्ना महादेवाच्या पूजेसाठी येत असताना शंभुनाथ यांनी तिचा पाठलाग केला. याच ठिकाणी रत्नाचे शिळेत रुपांतर झाले. पुढे याच ठिकाणी रत्नादेवीचे मंदिर उभारण्यात आले. अशी अख्यायिका सांगितली जाते.

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान -रत्नेश्वरी देवी मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविक या ठिकाणी येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात. त्यानंतर भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात ( Ratneshwari Devi fulfil devotees Wish ), अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दूर अंतराहू भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्र काळात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागते

ABOUT THE AUTHOR

...view details