महाराष्ट्र

maharashtra

Shah Rukh Khan News : शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात दोन जण घुसले, पोलिसांचा तपास सुरू

By

Published : Mar 3, 2023, 7:50 AM IST

गुजरातमधून आलेल्या दोन तरुणांनी गुरुवारी मन्नतच्या आतील भागात प्रवेश केला होता. बाहेरील भिंत पार करून त्यांनी प्रवेश मिळवला. अजून त्यांची नावे अजून समोर आली नाहीत. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे.

Two Entered into Mannat Bungalow
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात दोन जण घुसले

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आता नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. गुरुवारी दोन तरुणांनी सुपरस्टार शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात प्रवेश केला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील भिंत पार करून त्यांनी मन्नतच्या आतील भागात प्रवेश केला होता. ही बाब सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या दोन तरूणांना पकडले. 20 ते 22 वयोगटातील हे दोनही तरूण होते.

गुजरातमधून आले होते :पोलीस चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की ते गुजरातमधून आले होते. त्यांची नावे अजून समोर आली नाहीत.ते 20 ते 22 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. त्यांनी नुकताच शाहरूखचा सुपरहीट सिनेमा 'पठाण' पाहिला होता. तो पाहून त्यांना शाहरूखला भेटायची इच्छा झाली होती. सध्या त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत अतिक्रमण आणि इतर संबंधित गुन्ह्ये दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

पठाणच्या यशाचा आनंद :सध्या शाहरुख 'पठाण' च्या यशाचा आनंद घेत आहे. पठाम सिनेमाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तो जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झाला आहे. जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील अ‍ॅक्शनने भरलेल्या चित्रपटात दिसले होते. शाहरुख आता त्याच्या आगामी 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांच्या तयारीत आहे.

दोन्ही तरूणांची तपासणी सुरु : दोघांवर गुन्हा नोंदवला असून या दोन्ही तरूणांचा मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन्ही तरूणांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना मन्नतमध्ये घुसण्याचा हेतू विचारला असता त्यांनी शाहरुखला भेटायचे आहे, असे सांगितले. वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 जानेवारी शाहरुख खानचा पठान रिलीज झाला आहे. ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत हा, सिनेमा गेला आहे. आता महिनाभरानंतर पठाणच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली आहे. चित्रपटाने 37व्या दिवशी सर्वात मोठी शवटची 75 लाखांची कमाई केली होती. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 1023.5 कोटींवर गेली आहे.

टायगर 3मध्ये स्पेशन अ‍ॅपिरीअन्स :मनीष शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 प्रेक्षकांसाठी एक मोठे सरप्राईज घेऊन येत आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफ हे मुख्य भूमिकेत दिसनार आहेत. विशेष म्हणजे त्याच्या सिक्वेलमध्ये पठानची एन्ट्री होणार आहे. 'पठाण' या ब्लॉकबस्टर चित्रपटात सलमान खानने स्पेशन अ‍ॅपिरीअन्स दिला होता. त्यामुळे शाहरूख आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर टायगर 3 मध्ये त्याच्या खास भूमिकेसाठी शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा :SRK to start Tiger 3 : सलमानच्या टायगर 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार शाहरुख खान

ABOUT THE AUTHOR

...view details