ETV Bharat / entertainment

SRK to start Tiger 3 : सलमानच्या टायगर 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार शाहरुख खान

author img

By

Published : Feb 24, 2023, 4:36 PM IST

मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत, आता या चित्रपटात शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारणार आहे. लवकरच याच्या शुटिंगला शाहरुख सुरू करणार आहे.

SRK to start Tiger 3
SRK to start Tiger 3

मुंबई - मनीष शर्मा दिग्दर्शित, सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या टायगर 3 प्रेक्षकांसाठी एक मोठे सरप्राईज घेऊन येत आहे आणि त्याच्या सिक्वेलमध्ये पठानची एन्ट्री होणार आहे. 'पठाण' या ब्लॉकबस्टर चित्रपटात सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांनी त्याला प्रचंड उत्सुकता दाखवली होती आणि प्रतिसादही दिला होता. आता बॉलीवूडचा 'बादशाह' आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर टायगर 3 मध्ये त्याच्या खास भूमिकेसाठी शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे.

शाहरुख खान एप्रिल 2023 च्या अखेरीस 'टायगर 3' ची शूटिंग सुरू करेल. सूत्रांनी सांगितले की, टायगर 3 मध्ये पठाणच्या प्रवेशाकडे लक्ष द्या! YRF च्या ब्लॉकबस्टर स्पायचा एक भाग म्हणून सुपर-स्पाईज एकमेकांच्या चित्रपटांमध्ये झळकतैाना दिसणार आहेत. युनिव्हर्स, थिएटरमधील प्रेक्षकांना उत्कृष्ट मनोरंजन मूल्य प्रदान करण्यासाठी हे एक सरप्राईज असणार आहे.

पठाण चित्रपटात जेव्हा सलमान खानची एन्ट्री झाली होती तेव्हा दोन्ही खानच्या चाहत्यांनी त्याचे मोठे स्वागत केले होते. बराच काळ हे दोन सुपरस्टार पडद्यावर एकत्र दिसले नव्हते. त्यामुळे दोघांना जबरदस्त अवतारात पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी थिएटर दणाणून सोडले होते. दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे टायगर ३ मध्ये जेव्हा पठाणची एन्ट्री होईल तो एक मोठा धमाका असेल हे नक्की आहे.

प्रेक्षकांना एक संवाद आठवत असेल, ज्यात सलमानने पठाणमध्ये शाहरुखला सांगितले होते की, 'तो एका महत्वाच्या मिशनवर जात आहे. त्यामुळे पठाण या मिशन दरम्यान टायगरला भेटेल.' सूत्राने पुढे सांगितले की, 'शाहरुख टायगर 3 साठी एप्रिलच्या अखेरीस शूट करेल आणि शूट मुंबईत होण्याची अपेक्षा आहे. या शूटचे तपशील पूर्णपणे गुलदस्त्यात आहेत परंतु जेव्हा दोन सुपर स्पाईज टायगर 3 मध्ये पुन्हा भेटतात तेव्हा मोठ्या धमाक्याची अपेक्षा आहे.'

यापूर्वी शाहरुख खान आणि सलमानने 'पठाण' व्यतिरिक्त 'करण अर्जुन', 'कुछ कुछ होता है' आणि 'हम तुम्हारे हैं सनम'मध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2023 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, शाहरुख खानचे आगामी चित्रपट दक्षिणेकडील दिग्दर्शक अ‍ॅटलीचा संपूर्ण भारतातील अॅक्शन थ्रिलर 'जवान' आणि राजकुमार हिरानीचा पुढील 'डंकी' हे दान महत्त्वकांक्षी चित्रपट आहेत.

हेही वाचा - Actor Vishal Narrowly Escapes : शुटिंगवेळी फिल्म स्टुडिओत घुसला ट्रक, अभिनेता विशालचा थरारक अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.