महाराष्ट्र

maharashtra

मराठा आरक्षणाला शरद पवार, सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध- देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 4:55 PM IST

Devendra Fadnavis criticized Sharad Pawar : मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा सर्वाधिक विरोध असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते. तसंच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

Devendra Fadnavis criticized Sharad Pawar
Devendra Fadnavis criticized Sharad Pawar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण देताना

नागपूरDevendra Fadnavis criticized Sharad Pawar :मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा होता. शरद पवार यांच्या मनात असतं, तर त्यांनी मराठा आरक्षण दिलं असतं, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला आहे. नागपुरात शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवारांना फक्त समाजांना संघर्षात ठेवण्यातच रस आहे. शरद पवारांची राजकारणाची पद्धत अशीच आहे, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कार्यकर्त्यांनी संधीसाधू नेत्यांपासून सावध राहायला हवं. शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांची भूमिका कायम बदलत असते, त्यामुळं कार्यकर्त्यांनी यांच्या नादाला लागू नये असं फडणवीस म्हणाले.

ओबीसी अन्याय होणार नाही : महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय इतर कोणतेही प्रश्न नाहीत. भाजपा सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं. ते आमच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात टिकलं, पण भाजपा सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल. मात्र, ओबीसी समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. ओबीसी आरक्षणावर कोणतंही संकट येऊ देणार नाही, असं आश्वासन भाजपानं दिलं आहे. भाजपामधील ओबीसी, मराठा कार्यकर्त्यांना आपल्या समाजाची बाजू योग्य वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, आपला पक्ष प्रत्येक समाजाला न्याय देईल, असा विश्वास दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांनी ठेवला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

मराठा आरक्षणाबाबत आज राज्यात मोठं आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास पाहिला तर, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध करणारे शरद पवार होते. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

भाजपाचं कमिटमेंट ओबीसी सोबत :भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट पक्क आहे. एकीकडं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत. पण त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांचा आदर पण :कार्यकर्ता म्हणून आपल्याही मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी भावना असली पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट तयार होत आहे, याकडं लक्ष देण्याची गरज आहे. भाजपा कोणत्याही समाजाकडं आपली वोट बँक म्ह्णून बघत नाही. त्यामुळं निवडणुकीच्या निकालांची चिंता आम्ही करत नाही. निवडणुकांचे मुद्दे वेगळे असतात, या मुद्द्यांवर निवडणुका जिंकता येत नाही, हे समाजाचे प्रश्न आहेत. निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडं बघू नका, या मताचा मी आहे, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -

  1. धारावी पुनर्विकास प्रकल्प भारतातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा; संजय राऊतांचा गंभीर आरोप
  2. मराठा आरक्षण कार्यकर्ते जरांगे पाटील यांना 'नायक' बनवण्याच्या प्रयत्नात, एक महिना मुख्यमंत्री करण्याची मागणी
  3. सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा, काहीही झालं तरी धारावीकरांना घरं देणार; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details