महाराष्ट्र

maharashtra

लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात सहा जण ठार, एक गंभीर

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 10:05 AM IST

Updated : Dec 16, 2023, 11:27 AM IST

Nagpur Accident News : नागपुरातील काटोलमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर एकजण गंभीर जखमी झालाय.

Nagpur Accident
Nagpur Accident

नागपूर Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये रात्री भीषण अपघात घडला आहे. क्वॉलीस कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडलीय. क्वॉलीस गाडी नागपूरवरुन काटोलच्या दिशेनं जात असताना ट्रकनं जोरदार धडक दिली. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेनं परत जात होते, तेव्हा हा अपघात झाला. यातील जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

लग्न सोहळा आटोपून परतताना अपघात : या अपघातातील मृत व जखमी हे सर्वजण मेंढेपठार गावातील रहिवासी आहेत. मेंढेपठार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचं नागपुरात लग्न होतं. त्यासाठी हे सर्वजण नागपूरला गेले होते. रात्री लग्न सोहळा आटोपून ते आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाले. तेव्हा ताराबोडी परिसरात हा अपघात झाला असून यात भरधाव क्वॉलिस गाडीनं भरधाव वेगात ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात क्वॉलिस गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व सहा जण हे काटोल तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतकांमध्ये मयूर इंगळे (22), वैभव चिखले (32), सुधाकर मानकर (42), विठ्ठल थोटे (45), अजय चिखले (40) व रमेश हेलोंडे यांचा समावेश आहे. तर या अपघातात जगदीश ढोणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी :या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली.

हेही वाचा :

  1. मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, 10 प्रवासी जखमी
  2. समृद्धी महामार्गावरील अपघाताची युपीत पुनरावृत्ती, ८ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू
  3. ओडिशाच्या केओंझारमध्ये व्हॅनची ट्रकला जोरदार धडक; 8 ठार, तर 12 जखमी
Last Updated :Dec 16, 2023, 11:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details